Breaking News

कोपरगाव तालुक्यात रुग्ण संख्या घटली तर, खाजगी लॅब च्या अहवालात करंजीत एक रुग्ण !

कोपरगाव तालुक्यात रुग्ण संख्या घटली तर, खाजगी लॅब च्या अहवालात करंजीत एक रुग्ण !


करंजी प्रतिनिधी-
आज दिनांक ८ सप्टेंबर रोजी कोपरगाव कोविड सेंटर मध्ये एकूण १५ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यातील सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहे तर खाजगी लॅब च्या अहवालानुसार ८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

लक्ष्मीनगर-२
धारणगाव रोड-१
कोळपेवाडी-२
टाकळी फाटा-१
सम्यकनगर-१
करंजी-१

असे आज ८ सप्टेंबर रोजी कोपरगाव तालुक्यात एकूण ८ अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आढळून आले आहे.

आज रोजी कोपरगाव तालुक्यातील १७ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.

आज नगर येथे पुढील तपासणी साठी ३९ स्राव पाठविण्यात आले आहे.

आज अखेर कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या ११०० तर ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १६२ झाली आहे.

आज पर्यंत तालुक्यातील एकूण कोरोनामुळे मयत झालेल्या रुग्णाची संख्या २० झाली आहे.