Breaking News

स्वामी अग्निवेश यांचे दिल्लीत निधन

 नवी दिल्ली : हिरयाणाचे माजी शिक्षणमंत्री व सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांचे आज, शुक्रवारी लिव्हर सोरायसीसच्या आजाराने निधन झाले. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दिल्ली येथील रुग्णालयात उपचार सुरू होते.

स्वामी अग्निवेश यांनी 1970 साली आर्य सभा नावाचा पक्ष स्थापन केला होता. त्यानंतर 1977 मध्ये हरियाणाचे शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता. त्यानंतर 1981 मध्ये त्यांनी बंधुता मुक्ती मोर्चा नावाच्या संघटनेची स्थापनाही केली होती.दरम्यान 2011 साली अण्णा हजारे यांच्या आंदोलनातही स्वामी अग्निवेश सहभागी झाले होते. मात्र काही मतभेद झाल्याने ते या आंदोलनातून दूर झाले होते. स्वामी अग्निवेश हे बिग बॉसमध्येही सहभागी झाले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. लिव्हर सोरायसीस या आजाराने त्यांना ग्रासले होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या मुख्य अवयवयांनी काम करणे बंद केले होते. त्यामुळे मंगळवारी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. वरिष्ठ डॉक्टरांचे एक पथक त्यांना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते. मात्र, शुक्रवारी संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.