Breaking News

गावविकासांत अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची --अनुराग येवले

गावविकासांत  अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची  --अनुराग  येवले


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
      गाव विकासासाठी  शासनाच्या विविध योजना असतात  त्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्या बरोबरच प्रभावी पणे अंमलबजावनी करून राबविण्यासाठी मानसिकतेची गरज असते ग्रामस्थ आणि शासन यामधील समन्वय साधण्याचे काम त्या गावातील प्रशासकीय अधिकारी करत असतात शासनाचे कान व डोळे असलेले ग्राम अधिकाऱ्यांवरच त्या गावचा विकास अवलंबून असतो पर्यायाने गाव विकासात अधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची असल्याचे प्रतिपादन शिवबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनुराग येवले पाटील यांनी केले .
      कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील वीजवितरण कंपनीचे वायरमन श्री.बिडकर यांनी आपल्या ब्राम्हणगावातील  तीन वर्षांच्या कालावधीत उत्तम सेवा देत वेगळा ठसा उमटवला नुकतीच त्यांची बदली झाली त्यानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी अनुराग येवले बोलत होते.यावेळी पंचायत समितीचे सदस्य श्रावण आसने , पोलीस पाटील रविंद्र बनकर ,भाऊसाहेब सोनवणे,सचिन तांबे, अर्जुन नरोडे ,तुकाराम आसने, पांडुरंग गायकवाड,मुकुल कावडवाले, आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते