Breaking News

पारनेर तालुक्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा !

पारनेर तालुक्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा !

सुपा प्रतिनिधी
   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्म दिनानिमित्त  भाजपा तर्फे पारनेर तालुक्यात विविध लोकपोयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन वाढदिवस हा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. 
      सुपा शहरात भाजप युवा मोर्चाचे सागर मैड व मित्र परिवारा मार्फत सार्वजनिक ठिकाणी बसन्यासाठी बाकांचे लोकार्पण व मास्क वाटप  करण्यात आले. या कार्यास प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सर्वांनी सहभाग नोंदवल्या बद्दल सर्वांचे सागर मैड यांनी आभार मानले.
    या कार्यक्रमानिमीत्त भाजपा जिल्हा अध्यक्ष अरुण मुंडे, प्रसाद ढोकरिकर, अस्विनीताई थोरात, बाळासाहेब महाडिक,  तालुका अध्यक्ष वसंत चेडे, सुभाष दुधादे, दिलीप भालसिंग, बाळासाहेब पोटघन, दादासाहेब बोठे, बाळासाहेब नरसळे, विश्वास रोहकले, उषाताई जाधव, तुषार पवार, संतोष गायकवाड, सागर मैड, अशोक चव्हाण, सुनील पवार, नाजिम शेख, प्रदीप पवार, सरफराज खान, सुरेश बाफना, सतीश पवार, नितिन पवार, सद्दाम शेख,  इकबाल शेख, किशोर जाधव, अजीम शेख, सौरभ औचीते, सचिन उमाप, सात्विक दिवते, जावेद शेख, सचिन ठुबे, सोनुळे, अमोल मैड यांच्यासह सामाजिक अंतर ठेऊन कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्तित होते. 
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्म दिनानिमित्त सामाजिक कार्याचा सप्ताह पाळन्यात आला आहे. या निमित्त विविध सामाजिक कार्यक्रम राबवन्यात आले. 
रक्तदान शिबिर, बसन्याकरिता बाकांचे लोकार्पण,  फळ वाटप, मास्क वाटप, चष्मे वाटप, अनेक ठिकानी स्वच्छता अभियान, अशी अनेक विविध लोकोपयोगी उपक्रम या सप्ताहात राबाविन्यात आले, या कार्यास सर्वसामान्य जनतेचा मोठा प्रतिसाद लाभला.
     पुढील काळात भाजपा पक्षा मार्फत कार्यकर्त्यांनी जनसामान्यां करीता अशाच पद्धतीने सार्वजनिक कामात सहभाग नोंदवावा पन आपली स्वतःची व परिवाराची काळजी घेऊन, समाजाचीही काळजी घ्यावी. असे प्रतिपादम जिल्हा अध्यक्ष अरुण मुंडे यानी व्यक्त केले.