Breaking News

अर्णब गोस्वामी, कंगणाविरुद्ध हक्कभंग

कंगना के सपोर्ट में आए 'रिपब्लिक भारत' के एडिटर इन चीफ अर्नब गोस्वामी संजय  राउत पर बोला हमला,दिया खुला चैलेंज

 शिवसेना, काँग्रेसने मांडले हक्कभंग प्रस्ताव 
- अर्णब गोस्वामी सुपारीबाज पत्रकार; शिवसेना आक्रमक
- मुंबईचा अपमान करणार्‍या कंगनालाही दणका; विधान परिषदेत हक्कभंग

मुंबई/ प्रतिनिधी

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर राज्यातील सरकारविरोधात आक्रमक झालेल्या आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत सर्वांवर टीका करणारे रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज्य सरकारवर सातत्याने टीका करणार्‍या अर्णव गोस्वामींविरुद्ध शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव दिला. तसेच, मुंबईविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणारी अभिनेत्री कंगना राणावत हिच्याविरोधात काँग्रेसने विधान परिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला आहे. काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी हा प्रस्ताव मांडला.

कंगना राणावत हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. मुंबई मला पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी वाटते. मला असुरक्षित वाटत आहे, असे ती म्हणाली होती. कंगनाने मुंबईची बदनामी केल्याचे सांगत काँग्रेसचे सदस्य भाई जगताप यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी हा प्रस्ताव स्वीकारला. हक्कभंग समितीच्या अनुपस्थितीत मी स्वत: यावर निर्णय घेईन, असे निंबाळकर यांनी सांगितले. तसेच, सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाबाबत अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीने सातत्याने वृत्तांकन केले आहे. मात्र यादरम्यान, अर्णव गोस्वामी यांनी महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेविरोधात सातत्याने टीका केली.  तसेच अनेकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना आव्हान देण्याची भाषा केली होती. जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीवर अत्यंत घृणास्पदरित्या बेछूट आरोप ही वाहिनी करत आहे. पोलिस खात्याचाही वेळोवेळी अपमान केलेला आहे. पोलिस खात्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवला आहे, असे अरविंद सावंत यांनी म्हटले होते. अर्णब गोस्वामी यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख एकेरी भाषेत करुन धमकावले आहे. हे करतानाची त्यांची देहबोली अतिशय आक्षेपार्ह आणि संतापजनक होती. हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यामुळे अर्णब गोस्वामी आणि त्याच्या वृत्तवाहिनीवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्रातील जनता करत आहे. या प्रकरणी गृहखात्याने लक्ष घालून तातडीने त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी खासदार अरविंद सावंत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना केली होती. 

--

दोन्हीही सभागृहात हक्कभंगाचे प्रस्ताव

कंगनाबरोबरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणारे टीव्ही पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात शिवसेनेने विधानसभा व विधान परिषद अशा दोन्ही सभागृहात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे. विधानसभेत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी हा प्रस्ताव मांडला होता. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रस्तावाला अनुमोदन देत चर्चेची मागणी केली. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी विधिमंडळाच्या नियमानुसार या प्रस्तावावर कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले. तर, विधानपरिषदेत शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी गोस्वामी यांच्या विरोधात प्रस्ताव मांडला आहे.