Breaking News

रेल्वे पोलीसा चा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ ला पाचारण केले तहसीलदार ज्योती देवरे

रेल्वे पोलीसा चा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ ला पाचारण केले तहसीलदार ज्योती देवरे
------------
अनेक तास उलटूनही पोलिसाचा शोध लागेना
------------
काल पासून पथके पोलिसाला शोधण्यासाठी करताहेत अथक परिश्रम


पारनेर प्रतिनिधी - 
रुई चोंडा येतील धबधबा परिसरात रेल्वे पोलिस पाण्याच्या भोवर्‍यात सापडून डोहामध्ये अडकला आहे त्याचा शोध सुरु आहे मात्र शोध घेण्यास येथील पथकास अनेक अडचणी येत आहे त्यामुळे एनडीआरएफ ला पाचारण करण्यात आले आहे पुण्यावरून ही एनडीआरएफ ची टीम येणार असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे.
रेल्वे पोलीस फोटो काढत असताना डोहात पडला आहे त्याच्या सोबत पोलिस फोटो काढत होता त्याचा हात फॅक्चर झाला आहे नगर वरून आलेल्या आपत्कालीन वाहनाने अनेक वेळा गळ टाकला मात्र शोध लागला नाही हा डोह जवळपास 70 फूट खोल असल्याची माहिती समजली.


 पारनेर तालुक्यातील नुकताच प्रसिद्ध झालेल्या रुई चोंडा धबधब्यावर रेल्वे चे 4 पोलीस दि 24 रोजी दुपारी तीनच्या सुमारास आले होते तेथे फोटो काढत असताना एक पोलीस अचानक डोहामध्ये फसला गेला त्याच्या सोबतच्या मित्रांनी स्थानिकांना याबाबत माहिती दिली त्याला शोधण्याचा साठी स्थानिक ग्रामस्थ यांनी मदत केली तसेच पोलिस निरीक्षक राजेश गवळी सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ सह पोलिसही घटनास्थळी दाखल झाले  तहसीलदार ज्योती देवरे यांनी देखील घटनास्थळी जात शोध मोहिमेस गती दिली आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डाॅ बडदे व अग्निशमन अधिकारी मिसाळ यांचे मार्गदरशनाप्रमाणे प्रशासनाने अथक प्रयत्न केला मात्र शोध लागत नसल्याने अखेर पुण्यावरून एनडीआरएफ ला पाचारण करण्यात आले 5 वाजेपर्यंत हे पथक  येथे पोहचेल अशी माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली त्याचबरोबर पारनेर पोलीस निरीक्षक राजेश गवळी हे पथकासह शोधा शोध घेत आहेत रेल्वे पोलीस यांचे पथक शोध घेण्यासाठी आले आहे स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोध मोहीम राबवली जात आहे मात्र त्यात यश आले नाही कदाचित डोह खोल असल्याने त्याच्या कुठेतरी कपारीला या पोलिसाचा मृतदेह अडकला असण्याची शक्यता आहे त्यामुळे शोधास अडचणी येत आहेत एनडीआरएफ ची टीम आल्यानंतर शोध मोहिमेला गती येईल.