Breaking News

सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेवर आर्थिक संकट !


 मुंबई | कोरोना संकटामुळे देशातील आर्थिक स्थिती अस्थिर झाली आहे. तसेच, सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचं कंबरडं मोडलं आहे. कोरोनाचे संकट निवारण्यासाठी शेकडो कोटी रुपये खर्च करावे लागत असताना दुसरीकडे महसुलाद्वारे मिळणारे उत्पन्नात प्रचंड तूट निर्माण झाली आहे

कोरोना संकटामुळे देशातील सर्वाधिक श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचं कंबरडं मोडले आहे. कोरोनाचे संकट निवारण्यासाठी शेकडो कोटी रुपये खर्च करावे लागत असताना दुसरीकडे महसुलाद्वारे मिळणारे उत्पन्नात प्रचंड तूट निर्माण झाली आहे. परिणामी मुंबई महापालिकेला पहिल्यांदाच बँकेत असलेल्या ठेवींना हात घालावा लागत आहे.

मुंबई महापालिकेच्या विविध बँकांमध्ये सुमारे ७० हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. त्यातच या ठेवींवरील व्याजदरही कमी झालेले असल्याने यंदा १४०० कोटी रुपयांचे व्याजही कमी मिळणार आहे. महत्वाची बाजू म्हणजे राज्य सरकारने कोरोना संकटासाठी मुंबई महापालिकेला १ हजार कोटी रुपयांची मदत दिल्याची माहिती आहे.