Breaking News

"बाबरी पडली नसती तर राम मंदिराचं भूमिपूजन पहायला मिळालं नसतं"

 


मुंबई | बाबरी मशीद प्रकरणातील सर्व आरोपींना लखनऊच्या विशेष न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यावर शिवेसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

जर बाबरी मशीद पडली नसती तर राम मंदिराचं जे भूमिपूजन झालं आहे तो दिवस पहायला मिळाला नसता, असं म्हणत राऊत यांन न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.


दरम्यान, न्यायालयाने हा कोणताही पूर्नियोजित कट नव्हता असं सांगितलं आहे. हाच निर्णय अपेक्षित होता, असं राऊत यांनी म्हटलं आहे.