Breaking News

शेतमालाला बाजार भाव नसल्याने करंदी येथील तरुण शेतकऱ्यांनी केली आत्महत्या.

शेतमालाला बाजार भाव नसल्याने करंदी येथील तरुण शेतकऱ्यांनी केली आत्महत्या.
-------------
झाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या.


पारनेर प्रतिनिधी - 
पारनेर तालुक्यातील करंदी येथे एका तरुण शेतकऱ्यांनी शेतमालाला बाजार भाव नसल्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये तसा उल्लेख केला आहे.
करंदी येथील अशोक रभाजी मोहिते वय 38 हा तरुण दि. 15 रोजी सकाळी 10 वाजता घराच्या बाहेर पडला व तो घरी परतला नाही नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला दि 16 रोजी दुपारी दोनच्या सुमारास करंदी व हत्तलखिंडी परिसरातील वनविभागाच्या हद्दीमध्ये झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तो सापडला.
या तरुण शेतकऱ्याने  शेतीला नियमित  बाजार भाव नसल्याने  व त्यातून कर्जबाजारी झाल्यामुळे नैराश्यातून ही आत्महत्या केली असल्याचे त्यांनी लिहून ठेवलेल्या चिट्ठी वरून स्पष्ट होत आहे यामध्ये त्यांनी मी शेतकरी असून कर्जबाजारीपणा तून व शेतीस कंटाळून शेतमालाला भाव नाही दुधाला भाव नाही जवळ भांडवल नसल्यामुळे धंद्यात अडचणी येत होत्या स्वतःची गरिबी मुळे जीवनात निराशा आली होती अशाप्रकारे चिठ्ठीमध्ये त्याने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवले आहे.
गेल्या सहा महिन्यापासून शेतीतून उत्पन्न न मिळाल्याने या शेतकऱ्याने बँकेतून कर्ज काढले होते मात्र हे कर्ज फेडायचे कसे हा देखील प्रश्न त्याच्यासमोर होता आधी कोरोनामुळे सध्या पडत असलेल्या पावसामुळे शेतामध्ये काही हाताला लागले नाही.
अनेक दिवसापासून शेतमालाला बाजार भाव मिळत नव्हता कोरोनाकाळात तर शेतकऱ्याचे आर्थिक दृष्ट्या कंबरडे मोडले आहे शेतकऱ्यांनी आपल्याकडे असणारे भांडवल शेतीत गुंतवले मात्र त्यातून काही उत्पन्न न मिळाल्याने शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे तालुक्यात वटाणा मुग कांदा या सर्वच पिकातून शेतकऱ्यांची निराशा झाली आहे शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडले नसल्याने करंदी येथील हा धक्कादायक प्रकार झाला असल्याची बोलले जात आहे.या शेतकऱ्यांच्या पश्चात पत्नी आई वडील व दोन लहान मुले आहेत.