Breaking News

समता नगरच्या नागरिकांनकडून नगरपालिकेचे व मनसेचे आभार !

समता नगरच्या नागरिकांनकडून नगरपालिकेचे व मनसेचे आभार


करंजी प्रतिनिधी-
     कोपरगाव नगरपालिका हद्दीतील समता  नगर या रस्ताची अवस्था पावसाळ्यातअतिशय खराब झाली होती तेथील नागरिकांना गाडी घेऊन जाणे तर सोडा परंतु घरा पर्यंत पायी जाणे देखील आवघड झाले होते येथील स्थानिक नागरिकांनी  मनसे उपशहराध्यक्ष अनिल गाडे  यांना आपल्या समस्या सांगितल्या नंतर त्यानंतर अनिलभाऊ गाडे यांनी मनसे शहराध्यक्ष सतिश आण्णा काकडे यांच्या सोबत या विषयावर चर्चा करत   मनसे शहराध्यक्ष सतिश काकडे, उपशहराध्यक्ष अनिलभाऊ गाडे यांनी कोपरगाव  नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यास समता नगर  रस्त्याचे सत्य परीस्थितीचे फोटो दाखवून सदर रस्ता लवकरात लवकर न केल्यास त्याच रस्त्याच्या चिखलात बसून मनसे स्टाईल ने तिव्र स्वरूपाचे अंदोलन करण्याचा ईशारा दिला होता यावेळी मनसे शहराध्यक्ष सतिश काकडे , मा. तालुकाध्यक्ष अलिम शहा, उपशहराध्यक्ष अनिल गाडे, आनंद परदेशी, विजय सुपेकर ,रघुनाथ मोहिते , संजय चव्हाण , संजय जाधव,  बंटी सपकाळ, नितिन त्रिभुवन, जावेद शेख,  सचिन खैरे, सागर महापुरे,   जाधव, बापू काकडे, नवनाथ मोहिते आधी पदाधिकारी उपस्थित होते.
    या मनसे च्या इशाऱ्यानंतर नगरपालिका अधकाऱ्यांनी परिस्थिती लक्षात घेता  दोन दिवसात तेथे मुरुम टाकून रस्ता व्यवस्थित करून दिला आणि येणाऱ्या काही दिवसात हा रस्ता पूर्णपणे सिमेंट काँक्रीट चा नगरपालिकेच्या वतीने करण्यात येईल असे आश्वासन दिले त्या मुळे स्थानिक नागरिकांनी कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व कोपरगाव शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.