Breaking News

पळशी येथून एक लाख ६८ हजार रुपयांचा ४० ब्रास वाळू साठा जप्त !

पळशी येथून एक लाख ६८ हजार रुपयांचा ४० ब्रास वाळू साठा जप्त !
----------
एका महिले विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल !
-------
पारनेर प्रतिनिधी-
 पारनेर तालुक्यातील पळशी येथे शासनाची कोणतीही वाळू ऊपसाबाबत परवाना नसताना एक लाख ६८ हजार किमतीची सुमारे ४०  ब्रास वाळू ची उपसा करून ती विक्री करण्याच्या उद्देशाने साठवूनक केल्या प्रकरणी एक जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारनेर तालुक्यातील पळशी येथील गट न.६१७ मध्ये,आरोपी विमल रामचंद्र गागरे रा.पळशी,नागपुरवाडी,ता पारनेर,जि अहमदनगर हिने शासनाची कोणतीही वाळू ऊपसाबाबत परवाना अगर वाळू ऊपश्याचा अधिकृत लिलाव झालेले नसतानाही कोणत्या तरी नदी पात्रातून स्वत: चे फ़ायदया करिता ,विक्री करन्यचे उद्देशाने वाळूचा ऊपसा करुन बेकायदा साठावनुक केलेली आहे याबाबतची फिर्याद राम पाराजी शिरसाठ वय ५७ वर्ष यांनी दिली त्यानुसार पारनेर पोलीस स्टेशनमध्ये भा द वी क ३७९ सह भा.प.का.३/१५सह महा.जमीन महसूल अधिनियम ४८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.का.भिंगारदिवे करत आहेत.