Breaking News

कोल्हार घोटी रस्त्यावर पिकअप व मोटार सायकलच्या अपघात पोलीस पाटलाचा जागीच मृत्यू !

कोल्हार घोटी रस्त्यावर पिकअप व मोटार सायकलच्या अपघात पोलीस पाटलाचा जागीच मृत्यू !


अकोले/ प्रतिनिधी :
      समोरून येणाऱ्या पिकअप गाडीने   उडविल्याने  पोलीस पाटलाचा जागीच मृत्यू तर  एक जण गंभीररीत्या जखमी झाला  असून त्याला संगमनेर  येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहे . कोल्हार घोटी रस्त्यावर   राजूर  जवळ ही घटना घडली. फिर्यादी  महादू मंगा करवर याबाबत राजूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, बाभूळवंडी तालुका अकोले येथील पोलीस पाटील धोंडिबा मंगा करवर   वय ५५व ढवळा बहिरू लेंडे वय ४५ हे दोघे आपली मोटार सायकल एम एच ०४ सीएक्स ६१०७ घेऊन राजूरकडे येत असताना आरोपी चालक विकास चंद्रकांत चोथवे रा . राजूर हा आपली ताब्यातील पिकअप गाडी एम एच  ०४ डीएस ९६६१ घेऊन विरुद्ध दिशेने  रस्त्याकडे दुर्लक्ष्य करून भरधाव वेगाने येऊन मोटरसायकलला उडवून दिले त्यात पोलीस पाटील धोंडिबा मंगा  करवर याचा जागीच मृत्यू झाला तर मागील सीटवर बसलेला ढवळा बहिरू लेंडे यास गंभीर दुखापत झाली महादू मंगा करवर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून राजूर पोलिसांनी आरोपीविरोधात भा द वि कलम ३०४(अ ), २७९,३३७ , ३३८ ,४२७मोटारवाहन कायदा कलाम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सपोनि नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉ . कैलास शेळके तपास करीत आहे 
----