Breaking News

कंगना राणावत ला त्वरित अटक करावी - सभापती गणेश शेळके

कंगना राणावत ला त्वरित अटक करावी - सभापती गणेश शेळके
------------
कंगना राणावत प्रकरणी पारनेर तालुका शिवसेना आक्रमक तहसिलदार यांना निवेदन.
------------
कंगना राणावत ला महाराष्ट्रामध्ये राहण्याचा अधिकार नाही !


पारनेर प्रतिनिधी- 
     पारनेर तालुक्याच्या शिवसेनेच्यावतीने कंगना राणावत हिने  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकेरी भाषेत उल्लेख केल्याप्रकरणी तसेच त्यांच्यावर खालच्या भाषेत उल्लेख केल्याप्रकरणी निषेध व्यक्त करण्यात आला तसेच तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तिला त्वरित याबाबत अटक करावी अशी मागणी पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांनी केली आहे या असायचे निवेदन पारनेर च्या तहसिलदार ज्योती देवरे यांना देण्यात आले आहे.
     शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे  यांचा एकेरी शब्दात उल्लेख व खालच्या भाषेत शब्दप्रयोग केल्याबद्दल जाहीर निषेध गुन्हा दाखल करावा असे निवेदन शिवसेनेच्या वतीने देण्यात आले या प्रसंगी सभापती गणेश शेळके,पंचायत समितीचे सदस्य डॉ श्रीकांत पठारे, विजय डोळ,उपशहर प्रमुख संदीप मोढवे व शिवसैनिक उपस्थित होते यावेळी सभापती गणेश शेळके यांनी सांगितले भारतीय जनता पार्टीने कंगना राणावत ला बळ दिले करोना जन्य परिस्थितीत महाराष्ट्राचे राजकारण सध्या याच पातळीवर गेलंय, फरक एवढाच की,दारू पाजणारे बाहेरचे,आणि शिवीगाळ करणारी व्यक्ती देखिल बाहेरूनच बोलावलीय आता विचार करा एका रात्रीत राष्ट्रपती राजवट हटून, पहाटे शपथविधी होवू शकतो, सरकार बनू शकते, रात्रीच्या अंधारात झाडे कापू शकता, पंतप्रधान फक्त तीन तास झोपून 26 भारत सरकारचे सार्वजनिक सरकारी उपक्रम विकू शकतात,तर मग मुंबई महानगर पालिकेने अगोदर नोटीस देवून, अनधिकृत बांधकाम तोडले तर,यात गैर काय असा सवाल उपस्थित केले  शिवसैनिकांनी उपस्थित केला आहे.यावेळी  पारनेर तालुक्याच्या शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून कंगना रणावत ला अटक करावी अशी मागणी शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे

    कंगना राणावत ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली टीका तसेच त्यांचा एकेरी भाषेत केलेला उल्लेख हा निंदनीय आहे ज्या राज्यात कंगना राणावत ने आपल्या चित्रपटाच्या द्वारे प्रसिद्धी मिळवली मुंबईबाबत कंगना राणावत ने केलेले वक्तव्य बेताल आहे तिच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा अपमान झाला आहे त्यामुळे आम्ही तिचा निषेध व्यक्त करतो तसेच कंगना राणावत ला महाराष्ट्र मध्ये राहण्याचा अधिकार नाही.
-----------------
गणेश शेळके
सभापती पंचायत समिती पारनेर.