Breaking News

भंडारदरा येथे सोन्याचे दुकान फोडले जैन मंदिरात चोरीचा प्रयत्न !

भंडारदरा येथे सोन्याचे दुकान फोडले
जैन मंदिरात चोरीचा प्रयत्न


भंडारादरा / प्रतिनिधी
        अकोले तालुक्यातील   भंडारदरा येथे  एका सराफाच्या दुकानाची कुलुपे तोडुन अज्ञात चोरांनी वीस ते बावीस हजाराची चोरी केली  शेंडीचे जैन मंदिरातही या चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला.
       अकोले तालुक्यातील शेंडी ( भंडारदरा) येथे पंचशील चौकात असलेल्या रवी अनासने यांच्या मालकीच्या सोन्या चांदिच्या दुकानात बुधवारी मध्यरात्री शटरचे कुलपे तोडुन बेंटेक्सचा काही माल व गि-हाईकांचे रिपेअरिंगसाठी आलेल्या दांगिण्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. यामध्ये वीस ते बावीस हजार रुपयांची चोरी झाली असल्याची माहिती दुकानाचे मालक रवि अनासने यांनी दिली. दुस-या दिवशी दुकान उघडण्यास रवि अनासने गेले असता तेंव्हा त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. तर दुकानच्या जवळच असणा-या जैन मंदिरातही या चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. सदर घटनेत तीन चोर असल्याचे सी सी टी व्ही कॅमे-यात कैद झाले आहे मात्र राजूर पोलीस स्टेशन मध्ये अद्याप तक्रार दाखल नसल्याचे पोलीस सूत्रांनी  सांगितले 
-–---