Breaking News

समृद्धी महामार्गाच्या भरावावरील खळगा वाहून आल्याने कोकमठाणच्या शेतकऱ्यांचे मोठे नुसकान !

समृद्धी महामार्गाच्या भरावावरील खळगा वाहून आल्याने कोकमठाणच्या शेतकऱ्यांचे मोठे नुसकान.
-------------
गायत्री कंपनीला आधीच दिली होती सूचना.. पंचनामे करून नुसकान भरपाई द्या अन्यथा आंदोलन.


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम चालू आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी झालेल्या पावसाने कोकमठाण परिसरात चालू असलेल्या समुध्दी महामार्गाच्या भरावावर टाकलेला मातीमिश्रित खळगा वाहून शेजारी असलेल्या शेतकर्‍यांच्या सोयाबीन ,मका, ऊस व कांद्याच्या शेतात वाहुन आल्यामुळे संबंधित शेतीचे मोठे नुकसान झाले असून या खळग्या मुळे जमीन नापीक होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. हे भराव दाबण्यासाठी शेतकऱ्यांनी गायत्री कंपनीच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना केल्या होत्या मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच शेतकऱ्यांचे आज लाखो रुपयांचे नुकसान झाले.प्रशासनाने गायत्री कंपनीला जबाबदार धरुन सदर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आम्हाला नुसकान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेतकरी बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. जर पंचनामे होऊन नुसकान भरपाई मिळाली नाही तर आम्ही सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन मोठे आंदोलन करु असा इशाराही त्यांनी दिला आहे.
कोकमठाण परिसरात पुणतांबा महामार्ग व समृद्धी महामार्गाचा जेथे मिलाफ होतो त्या परिसरात सर्वे नंबर 266 मध्ये बाळासाहेब भाऊराव थोरात यांची सहा एकर जमीन समृद्धी महामार्गाच्या कामावर टाकलेल्या मुरूम मिश्रीत खळगा वाहून आलेल्या त्यांची संपूर्ण शेती उद्ध्वस्त झाली . आठ पाईली कांदा रोप अक्षरशः
सडुन गेले जवळपास एक लाख रुपये कांदा उळे घेण्यासाठी त्यांना खर्च आला होता. तर चार एकर सोयाबीन उपळून गेली व भुईमूग ही अर्धा एकर जमीनदोस्त असे जवळपास त्यांचे सात लाखाच्या वरती नुकसान झाले आहे.तर संजय एकनाथ थोरात ,एकनाथ मारुती थोरात, विजय आप्पासाहेब दाभाडे, संदीप भास्कर दाभाडे अदी समृद्धी महामार्गाच्या रोड लगत असलेल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन मका बाजरी आदी पिके या वाहून आलेल्या खळग्याने खराब झाले. संपूर्ण पिकांची नुकसान झाली. वाहून आलेल्या खळग्याने झालेल्या नुकसानीची माहिती गायत्री कंपनीच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी दिली. अधिकारी परिस्थिती पाहण्यासाठी आले मात्र अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा तोडगा न काढता काढता पाय घेतला.या समृद्धी महामार्गाचे काम चालू असताना या शेतकऱ्यांनी कोकमठाण येथे ग्रामसभा घेऊन सदर भराव दाबण्यासाठी गायत्री कंपनीला लेखी निवेदन दिले होते मात्र तसे न झाल्यामुळेच सदर खळगा शेतकऱ्यांच्या जमिनीत वाहुन आला आणि हे नुसकान झाले आहे.सदर परिस्थितीची पाहणी प्रशासनाने करून या सर्व बाबीला गायत्री कंपनीला जबाबदार धरून शेतकऱ्यांना नुसकान भरपाई मिळावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे