Breaking News

माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम तालुक्यात उद्यापासून राबवली जाणार तहसीलदार ज्योती देवरे.

 माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम तालुक्यात उद्यापासून राबवली जाणार तहसीलदार ज्योती देवरे.

-----------
या मोहिमेमध्ये सर्व लोकप्रतिनिधी सहभागी असणार आहेत.
----------
मोहीम शोधा, संपर्क करा व उपचार द्या.या त्रिसुत्रीवर आधारित!
-----------
पथक नेमले जाणार सदस्यांना ' कोरोनादुत' म्हणून संबोधले जाईल


पारनेर प्रतिनिधी- 

माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम पारनेर तालुक्यात यशस्वीरित्या राबविली जावी यासाठी दि १४ रोजी तहसिल कार्यालय पारनेर येथे सर्व लोकप्रतिनिधींची व कार्यालय प्रमुखांची बैठक घेण्यात आली. सभापती,नगराध्यक्ष, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य व शासकीय विभागांचे विभाग प्रमुख बैठकीसाठी हजर होते.

यावेळी तहसीलदार ज्योती देवरे यांनी या मोहिमेत विषयी माहिती सांगितली तसेच उपस्थितांकडून अभिप्राय मागविले यावेळी पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश लाळगे नगराध्यक्ष वर्षा नगरे पस सदस्य डॉ श्रीकांत पठारे नगरसेवक नंदकुमार देशमुख किसन गंधाडे आदी उपस्थित होते 

ही मोहीम शोधा, संपर्क करा व उपचार द्या.या त्रिसुत्रीवर आधारित कोव्हीड आटोक्यात आणणारी प्रणाली प्रशासन या योजनेच्या माध्यमातुन जनतेपर्यंत अगदी वाडी-वस्ती, तांडयापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करत आहे.उद्देश संशयीत कोव्हीड तपासणी व उपचार. अतिजोखमीचे (Co-morbid) व्यक्ती ओळखुन त्यांना उपचार व कोव्हीड १ ९ प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण देणे. रुग्णांचे गृहभेटीतुन सर्वेक्षण गृहभेटीद्वारे प्रत्येक नागरिकांचे आरोग्य शिक्षण यामधून राबवले जाणार आहे या मोहिमेचे ठळक वैशिष्ट्ये स्थानिक लोकप्रतिनिधींचे सहकार्य सरपंच/ नगरसेवक यांचे शिफारशीने स्वयंसवेकांची नियुक्ती .पहिला टप्प्यात दि. १५/ ० ९/ २०२० ते १०/१०/२०२० दुसरा टप्पा दि. १४/१०/२०२० ते २४/१०/२०२०.असणार आहे यात वैयक्तिक/ संस्थांसाठी बक्षिसे. प्राथमिक आरोग्य केंद्र केंद्रस्थानी ठेऊन पथके. (ग्रामपातळीवर पनवेक्षकीय-६८ पथके व ४ नगरपंचायत क्षेत्रात अशी एकुण ७२ पथके, प्रत्येक ४ पथकामागे १ विभाग प्रमुख असे १७ अधिकारी नेमणुक करण्यात आली आहे.) १ पथक एका दिवसांत ५० घरांना भेटी देईल. पथकातील सदस्यांना  ' कोरोनादुत' म्हणून संबोधले जाईल पथकात एक आरोग्य कर्मचारी, आशा कर्मचारी २, स्थानिक स्वयंसेवक (१ पुरुष व १ स्त्री) व प्रत्येक दिवशी एक शिक्षक.शिक्षकांना पथकात नियुक्त करण्यात आले आहे लोक शिक्षण व प्रबोधन शिक्षक चांगले करून योग्य प्रकारे आरोग्य शिक्षण देऊ शकतात अशा प्रकारचा हा उपक्रम असणार आहे उद्यापासून उपक्रमाला सुरुवात होणार आहे कळत या ठिकाणी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.