Breaking News

श्रीगोंदयातील मोरे दादा हॉस्पिटल पत्रकार, पोलिस, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी १० बेड राखीव ठेवणार.

श्रीगोंदयातील मोरे दादा हॉस्पिटल पत्रकार, पोलिस, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी १० बेड राखीव ठेवणार.


काष्टी प्रतिनिधी :
कोरोना लढाईत रात्रंदिवस जीवाची पर्वा न करता प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, पोलीस बांधव, दिवसरात्र एक करून कोरोना रोगाविषयी जनजागृती करणारे पत्रकार व सामाजिक बांधिलकी बाळगत निस्वार्थपणे समाजकार्य करून गोरगरिबांना मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते या दुसऱ्यांसाठी जगण्याचा लढाईत राबणारे वेळप्रसंगी बाधीत होऊन पुरेशे उपचार व रुग्णालयात बेड न मिळाल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे आढळून आले आहे.
        पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या निधनाने वास्तव समोर आल्याने श्रीगोंदा शहरातील प. पू. मोरे दादा हॉस्पिटलचे संचालक डॉ. संतोष हिरडे यांनी पोलीस, पत्रकार व निस्वार्थ सामाजिक कार्यकर्त्यांसाठी त्यांच्या हॉस्पिटल मध्ये १० बेड राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
      श्रीगोंदा शहरातील मोरेदादा हॉस्पीटलमध्ये एकूण १०० बेड आहेत. त्यापैकी २० आय.सी.यू.बेड व दोन व्हेंटिलेटर आहेत. सध्या व्हेंटिलेटर ऑपरेटिंग सिस्टीम चालविणारे माणसे मिळत नाहीत.परंतु डॉ. हिरडे म्हणाले की लवकरच व्हेंटिलेटर चालू करणार आहे. पुढे ते म्हणाले की, आमचे हॉस्पिटल शासनाने अधिग्रहित केल्यापासून अनेक कोरोना पेशंट भरती झाले व बरे होऊन घरी परतले आहेत. डॉ. हिरडे यांनी आवाहन केले की कोरोना बाधा झाल्यानंतर घाबरुन न जाता मोरेदादा हॉस्पीटलशी संपर्क करुन, कोरोनातुन बरे होऊन बिनधास्त घरी जाऊ शकता. अशी ग्वाही डॉ.संतोष हिरडे यांनी दिली आहे.
     डॉ.हिरडे यांच्या सामाजिक बांधिलकी व कोरोना योद्धयांसाठी केलेल्या सामाजिक उपक्रमाचे पोलीस, पत्रकार व समाजातील सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.