Breaking News

सोनियाजींची तब्येत बिघडली, अमेरिकेला रवाना

 - राहुल गांधीही आईसोबत अमेरिकेला

Sonia Gandhi to continue as Congress interim chief | Deccan Herald

नवी दिल्ली/ प्रतिनिधी

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपचारांसाठी शनिवारी अमेरिकेला रवाना झाल्या आहेत. त्यांच्यासोबत राहुल गांधी देखील आहेत. नियमित वैद्यकीय तपासणीसाठी त्या अमेरिकेला गेल्या आहेत, असे सांगण्यात आले असले तरी, त्यांची तब्येत पुन्हा बिघडली असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या काळजीपोटी राहुल गांधी हेदेखील सोबत गेले असून, आठवडाभरात पुन्हा भारतात परततील, असे सांगण्यात आले.

दरम्यान, सोनिया गांधी यांची वैद्यकीय चाचणी यापूर्वीच करण्यात येणार होती. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्यांची वैद्यकीय तपासणी आता करण्यात येणार आहे. अशी माहिती अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली. वैद्यकीय चाचणीसाठी अमेरिकेत गेल्यामुळे सोनिया गांधी संसदेच्या अधिवेशनात उपस्थित राहू शकणार नाहीत. त्या दोन आठवड्यांनी भारतात परततील, असेही काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले. आठवडाभरात राहुल गांधी पुन्हा परतल्यानंतर पावसाळी अधिवेशनात सहभागी होतील, असेही सांगण्यात आले.

--------------------------