Breaking News

“जागतिक फार्मासिस्ट दिनाचे” परिक्रमा मध्ये आयोजन.

“जागतिक फार्मासिस्ट दिनाचे” परिक्रमा मध्ये आयोजन.


काष्टी प्रतिनिधी :
 माध्यमातून मानवसेवा करणाऱ्या, २४ तास मेडिकल मध्ये उभा राहून रुग्णाला लागणारे मेडिसिन देण्यासाठी तत्पर असणारा, कोरोना सारख्या महाभयंकर महामारीतही झटणारा, नवीन औषधाची माहिती देण्यासाठी तासंतास डॉक्टरांची वाट पाहत बसणार, अश्या सर्व "फार्मासिस्ट " बंधू-भगिनींचा महत्वाचा दिवस म्हणजे "२५ सप्टेंबर " "जागतिक फार्मासिस्ट दिवस. " या  दिवसाचे औचित्य साधून कष्टी येथील मा. ना. श्री. बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्टच्या 'परिक्रमा' शैक्षणिक संकुलातील औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालया मध्ये ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ.सुनील निर्मल यांनी दिली. 
         या स्पर्धेसाठी "रोल ऑफ फार्मासिस्ट इन कम्युनिटी हेअल्थ ", "ग्लोबल हेअल्थ आफ्टर COVID-१९." "रोल ऑफ फार्मासिस्ट इन नेसन  बिल्डिंग " "करिअर ऑपोर्तुंनिटी आफ्टर बी .फार्मसी " " फार्मासिस्ट: एक योद्धा " हे विषय ठेवण्यात आले होते. जवळपास २५०-३०० विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम आपल्या घरी बसून मोबाईल च्या माध्यमातून पाहिला. सहभागी स्पर्धकांनी खूप चांगल्या प्रकारे आपले विचार व्यक्त केले. वक्तृत्व स्पर्धेमधील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन प्रा. श्रीकांत दरेकर, डॉ. ज्ञानदेव गाढवे आणि प्रा. अनुराधा पाटील यांनी केले. 
         "जागतिक फार्मासिस्ट” दिनाच्या संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभाताई पाचपुते, सचिव श्री. विक्रमसिंह पाचपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रतापसिंह पाचपुते,संकुल संचालक डॉ. विजय पाटील व मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. अनिल पुंड यांनी शुभेछ्या दिल्या.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  प्रा. सचिन अनभुले आणि त्यांच्या सर्व सहकारी यांनी प्रयन्त  केले.