Breaking News

पारनेर शहरातील दोन दुकाने तहसिलदारांनी केली सील, तहसीलदार ज्योती देवरे यांची कारवाई !

पारनेर शहरातील दोन दुकाने तहसीलदारांनी केली सील !
--------
सोशल डिस्टन्स सॅनिटायझर माक्स न वापरणाऱ्या दुकानदारांवर होणार कारवाई- तहसीलदार ज्योती देवरे.


पारनेर प्रतिनिधी-
पारनेर शहरामध्ये दोन दुकानांमध्ये सोशल डिस्टन्स पालन न केल्याने व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन न केल्यामुळे या दुकानावर कारवाई करत तहसीलदार ज्योती देवरे यांनी दुकाने सील केले आहेत.
पारनेर शहरांमध्ये नागरिक प्रचंड दुकानांमध्ये गर्दी करत आहेत दुकानदारही कोणत्याही प्रकारचे प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन करत नाहीत तसेच शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे यामुळे तहसीलदार ज्योती देवरे यांनी पारनेर शहरातील स्वामी झेरॉक्स व किटली चहा सेंटर या दुकानांवर कारवाई करत दुकाने सील केली आहे.
शहरातील ज्या दुकानांमध्ये सॅनिटायझर चा वापर करत नाहीत निर्जंतुकीकरण फवारणी केली जात नाही काउंटर वारंवार साफ केले जात नाही सोशल डिस्टन्स चे पालन न करणे दुकानांसमोर काहीतरी अटकाव केला नसेल दुकानांसमोर चौकोन आखून ठरावीक अंतरावर ग्राहकांना उभे केले नसेल अशा प्रकारची दुकाने निदर्शनास आल्यास त्वरित सील करण्यात येतील या दुकानदारांना कुठलीही पूर्वसूचना न देता त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे त तहसिलदार ज्योती देवरे यांनी सांगितले आहे.