Breaking News

कोपरगाव तालुक्यात ३१ रुग्णाची वाढ तर ३१ कोरोनामुक्त !

कोपरगाव तालुक्यात ३१ रुग्णाची वाढ तर ३१ कोरोनामुक्त
------------
शहरात आज परत एकाचा मृत्यू


करंजी प्रतिनिधी- आज दिनांक २६ सप्टेंबर रोजी कोपरगाव कोविड सेंटर मध्ये एकूण २१४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २५ बाधित तर १८९ अहवाल निगेटीव्ह आले आहे तर नगर येथील अहवालात २ तर खाजगी लॅब च्या अहवालात ४ कोरोना बाधित आढळून आल्याची माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

संजीवनी-१
कोळपेवाडी-१
जेऊर पाटोदा-१
शिंगणापूर-२
वारी-२
माहेगाव देशमुख-१
शहजापूर-६
साखर वाडी-१
संवत्सर-१
सुरेगाव-१
बेट-१
टिळकनगर-१
शिवाजी रोड-४
लक्ष्मी नगर-७
सह्याद्री कॉलनी-१असे आज २६ सप्टेंबर रोजी कोपरगाव तालुक्यात एकूण ३१ अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आढळून आले आहे.

 आज रोजी कोपरगाव तालुक्यातील ३१ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.


आज अखेर कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या १७३४ तर ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १६० झाली आहे.

 आज रोजी कोपरगाव शहरातील वाणी सोसायटी मधील ७२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे त्यामुळे आज पर्यंत कोपरगाव  तालुक्यातील  एकूण कोरोनामुळे मयत  झालेल्या रुग्णाची संख्या ३१ झाली आहे.