Breaking News

कोपगावात सुसज्ज प्रायव्हेट कोविड हॉस्पिटल सुरु करावे -- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील !

कोपगावात सुसज्ज प्रायव्हेट कोविड हॉस्पिटल सुरु करावे -- माजी नगराध्यक्ष  मंगेश पाटील !


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
      कोपरगाव तालुक्यात   दिवसेंदिवस  कोरोना चे रुग्ण वाढत चालले बाहेर अशा रुग्णांना आॕक्सिजनसह व्हेंल्टीनेटर बेड सहजासहजी  मिळत नाही नागरिकांमध्ये सध्या  याची भीती निर्माण झाली आहे . विशेषतः लहान मुले , वयोवृद्ध नागरिक ,  शुगर रुग्ण, रक्तदाब  ,दमा , किडनी इत्यादी आजारांच्या रुग्णांनी  तर धसकाच घेतला आहे. आज पर्यंत शहरातील सर्वेच प्रॅक्टिस करणारे डॉक्टर कोपरगाव  तालुक्यातील जनतेसाठी देवदुच ठरले माञ. इतर तालुक्यांचा विचार करता  दुर्दैवाने कोपरगाव हे असे गाव आहे की येथे प्रायव्हेट आद्यवत सुसज्ज  कोरोना हॉस्पिटल एकही नाही तरी सर्व डॉक्टरांनी शहरात सर्वसोयी युक्त कोरोना हॉस्पिटल उभारावे त्यास जागा उपलब्धतेसाठी नगर पालिकेने सहकार्य करावे अशी विनंती सह मागणी  माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी   केली आहे.  .
    मा.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी  म्हटले आहे की तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येने हजारी पार केली अॕक्टीव्ह रुग्ण कमी वाटत असले तरी ही संख्या वाढणारी आहे तालुक्यात अशा रुग्णांसाठी सध्या तालुक्यात असणारी व्यवस्था भविष्यात अपुरी पडणार असुन  ऑक्सिजन आणि व्हेंल्टिनेटर ची सोय जीची आज खरी गरज नागरिकांना आहे ,असे असणारे सुसज्ज हॉस्पिटल झाले तर.निदान जे  लोक पैसे  देऊ शकतात त्यांना ईथे उपचार घेता येईल. त्यामुळे गोरगरीब  सामान्य लोकांसाठी जे  एस.एस.जी.एम कॉलेज येथे जे कोविड सेन्टर आज आहे त्याच्यावर लोड येणार नाही तेथेही काही बेड व्हेल्टिनेटर चे करावे, तिथेही जास्त प्रमाणात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपलब्ध व्हावे , त्यामुळे लोकांमधली भीती कमी होऊन लवकर रुग्ण संख्या आटोक्यात येईल आणि कोणी पेशंट दगावणार नाही ,
         आदरनीय  आमदार., नगराध्यक्ष,  पंचायत समिती सभापती,  जिल्हापरिषद .सदस्य . सरपंच  पोलीस पाटील ,.  तहसीलदार  ,.पोलीस प्रशासन , ग्रामीण रुग्णालय , आरोग्य केंद्र , नागरपालिका रुगणालय इत्यादी सह सर्व.डॉक्टर्स , नगरपालिका .अधिकारी, स्टाफ , कोविड सेंटर येथील सर्वे स्टाफ , नर्सेस , आरोग्य सेविका , आशा सेविका ,रुग्णवाहीका कर्मचारी  , सफाई कर्मचारी ,.स्वछता दूत.समन्वयक , सामाजिक कार्यकर्ते ,मंडळे , पंचायत समिती ,  शासन , प्रशासन  या कोरोना पासून जनतेला वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम  करत आहे केले आहे. हे कधीही  तालुक्यांतील नागरिक विसरू शकणार नाही. या साठी  नगरपालिकेचे मुख्यधिकारी .प्रशांत  सरोदे  यांना विनंती आहे की आपण कोपरगाव शहरात अशी जागा ईमारत   जेथे नवीन प्रायव्हेट हॉस्पिटल कोविड अध्यवत  सेंटर  सुरू करता येईल याची माहिती तातडीने घ्यावी आणि डॉक्टर्स यांना विनंती करून यासाठी जे काही सहकार्य करतायेईल ते डॉक्टर्स यांना करावे आणि हे करण्यात तातडीने पुढाकार घ्यावा.१०० वर्षानंतर असा जीव घेणा आजार आला आहे ,
ह्याच विषयाची चर्चा  शहरासह , ग्रामीण भागात ,  चालू आहे की जर कोणी पेशंट सिरीयस झाले आणि त्या पेशंट ला  मोठ्या शहरात हलवायची वेळ आली तर शहरातले बहुतांशी हॉस्पिटल हे फुल्ल आहेत असे म्हणतात आणि त्या ठिकाणी पेशंट बरोबर कोणालाही थांबू देत नाही , त्यामूळे खूप हाल होती , गडबड होती , धावपळ होती.. याची चर्चा जी सर्वत्र चालू आहे ,ती मी जनतेच्या वतीने हाथ जोडून मागणी करत आहे आणि ज्यांना हे करणे शक्य आहे आणि जे पुढाकार घेऊन सुरू करतील त्यांचे आम्ही ऋणी राहू असेही माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी म्हटले आहे