Breaking News

राहाता विरभद्र मंदिरातील चोरट्या ला मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात, एल सी बी ची कारवाई !

राहाता  विरभद्र मंदिरातील चोरट्या ला मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात, एल सी बी ची कारवाई !


शिर्डी/प्रतिनिधी-- 
राहाता येथील विरभद्र मंदिराच्या मूर्तीचे मुकुट पादुका व इतर दागिने प्रकरणी एकाला पेमगिरी जंगलात अटक करण्यात आली.ही कारवाई एल सी बी व्दारे करण्यात आली.
               जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेश कुमार सिंग श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक दीपक दिपाली काळे शिर्डी चे उप विभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे व एल सी बी चे अधिकारी दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध पद्धतीने तपास करून व मिळालेल्या माहितीच्या आधारे सराईत गुन्हेगार असल्याचे समजते .पोलीस पथकाने नांदूर येथे जाऊन तपास केला असता सदर गुन्हेगार हा प्रेमगिरी च्या डोंगरावर जाऊन जंगलात लपून बसला आहे असे समजतात पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून शोध मोहीम सुरू केली तर त्या ठिकाणी आरोपी आढळून आला त्यांची चौकशी करून ताब्यात घेण्यात आले आरोपीने चोरी केलेले  सर्व साहित्य व मुद्दे मलाच एका शेतामध्ये लपवून ठेवण्यात आले होते तर आरोपीने कोरठण खंडोबा मंदिर पारनेर येथून दोन महिन्यापूर्वी चोरीचा गुन्हा दाखल असून त्याच्यावर पारनेर संगमनेर नाशिक या ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती जिल्हा प्रमुख अखिलेश कुमार सिंग यांनी यावेळी माहिती  दिले आरोपीला चोरी केलेल्या ठिकाणी आणण्यात आले होते,तर दुसऱ्या आरोपी चा कसून शोध सुरू आहे.