Breaking News

आमदार आशुतोष काळेंच्या सुचनेनुसार नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे

आमदार आशुतोष काळेंच्या सुचनेनुसार नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे


  कोपरगाव प्रतिनिधी  -
      कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागाला रविवारी झालेल्या वादळी पावसामुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे असे आदेश रविवारीच आमदार आशुतोष काळे यांनी प्रशासनाला दिले होते. त्या आदेशावरून सोमवार (दि.७) रोजी महसूल व कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली. तत्पूर्वी रविवारी सायंकाळी उशिरा तहसीलदार योगेश चंद्रे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन सुधाकर रोहोम,जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार यांनी झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला होता.मात्र रात्री उशिर झाल्यामुळे झालेल्या नुकसानीचा नेमका अंदाज आला नव्हता. मात्र सोमवारी सकाळीच सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम यांनी पूर्व भागात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
                      अचानक आलेल्या नैसर्गिक संकटामुळे मका, बाजरी, कपाशी, कांदा रोप, ऊस आदी पिके भुईसपाट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यावर येणाऱ्या सर्वच संकटात आमदार आशुतोष काळे नागरिकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले असून याही संकटात नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून तुम्हाला झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील अशी ग्वाही उपाध्यक्ष सुधाकर रोहोम व सभापती सौ. पोर्णिमा जगधने यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिली. यावेळी कारभारी आगवन, पंचायत समिती उपसभापती अर्जुन काळे, सदस्य मधुकर टेके, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक संजय आगवन, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,सहाय्यक गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, सर्व कृषी सहाय्यक,तलाठी, ग्रामसेवक व शेतकरी उपस्थित होते.