Breaking News

अतिदृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन भरपाई द्या !

अतिदृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन भरपाई द्या ! 
----------------
अन्यथा अमरण उपोषणाचा भाजपा युवा मोर्चेचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुशराव काळे यांचा इशारा !


नेवासा तालुका प्रतिनिधी :
       गेल्या दोन - तीन वर्षांमध्ये सातत्याने दृष्काळ व अतिवृष्टिमुळे शेतकरी हातबल झालेला असतांना सध्या कोरोनाचे संकट उभे राहिले आहे.त्यातच सध्या सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झालेले असून पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई - द्या अन्यथा शेतकऱ्यांसह नेवासा तहसिल कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुशराव काळे पाटील यांनी दिला आहे.
       राज्याच्या मुख्यमंञ्यांना दिलेल्या निवेदनात भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष काळे यांनी म्हटले आहे. की,डाळींब,कपाशी,तुर,सोयाबीन,मका,उडीद व इतर पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे नुकसान झालेल्या पिकांची समक्ष पाहणी करुन पंचनामे करा अन्यथा तहसिल कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशाराही काळे यांनी दिला आहे.