Breaking News

अकोल्यात आज ३२ कोरोना रुग्णांची भर, कोरोना बळींची संख्या १५ वर !

अकोल्यात आज ३२ कोरोना रुग्णांची भर, कोरोना बळींची  संख्या  १५ वर !


अकोले /प्रतिनिधी
अकोले तालुक्यात आज उशिरा हाती आलेल्या माहितीनुसार अकोल्यात ३२ कोरोना रुग्णांची भर पडली तर आंभोळ येथील एकाचा कोरोना ने  बळी गेल्याने तालुक्यात बळींची संख्या १५ झाली आहे.
तालुक्यातील  अंभोळ येथील ७० वर्षीय पुरूषाचा अहमदनगर येथे उपचार सुरु असताना मृत्यू झाला असुन यारुपाने तालुक्यातील कोरोनाने १५ वा बळी गेला आहे.
 सकाळी घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये अकोले शहरातील कारखाना रोडवरील  राधानगर  कॅालणीतील ३४ वर्षीय पुरूष, ३३ वर्षीय पुरूष, नवलेवाडी येथील ३२ वर्षीय महीला,११ वर्षीय मुलगा,समशेरपुर येथील २० वर्षीय तरुण,१४ वर्षीय तरुण,धामणगाव आवारी येथील ५२ वर्षीय पुरूष, ढोकरी येथील ५२ वर्षीय महीला,शेरणखेल येथील ५८ वर्षीय पुरूष, धामणगाव पाट येथील १९ वर्षीय तरुण,पिंपरकणे येथील ४० वर्षीय पुरूष, लिंगदेव येथील ४८वर्षीय पुरूष, ४० वर्षीय महीला,८२ वर्षीय पुरूष, १३ वर्षीय मुलगा,पाडाळणे येथील ३९ वर्षीय पुरूष, ७० वर्षीय पुरूष, ६५ वर्षीय पुरूष, ३४ वर्षीय महीला,३६ वर्षीय महीला, २० वर्षीय महीला,१४ वर्षीय युवती, राजुर येथील ३५ वर्षीय महीला,४२ वर्षीय महीला,०९ वर्षीय मुलगा,१७ वर्षीय युवती,११ वर्षीय मुलगी, अशा २७ तर खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात राजुर येथील ५४ वर्षीय पुरूष ,५५ वर्षीय पुरूष,४३ वर्षीय पुरूष, लहीत खुर्द येथील ५७ वर्षीय पुरूष,पिंपळदरी येथील २९ वर्षीय पुरूष अशा  ०५ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आल्याने आज दिवसभरात एकुण ३२ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.
तालुक्यातील एकुण बाधित रुग्णसंख्या  ८६० झाली आहे.तर आत्तापर्यंत ६८८ व्यक्ती उपचार करून बरे होऊन घरी गेलेत १५ व्यक्तीचा मृत्यू झाला तर १५७ व्यक्ती  उपचार घेत आहे.