Breaking News

IPL 2020 संयमी धोनी विरुद्ध उत्साही रोहितच्या नेतृत्वाची परीक्षा

  IPL 2020  संयमी धोनी विरुद्ध उत्साही रोहितच्या नेतृत्वाची परीक्षाअबूधाबी : आयपीएलच्या १३ व्या पर्वात सलामीला सर्वात यशस्वी असलेले रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आणि संयमी महेद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्ज हे दोन संघ आज शनिवारी पुन्हा एकदा एकमेकांविरुद्ध झुंज देणार आहेत. पहिल्याच 'हायव्होल्टेज' लढतीत कोण बाजी मारणार हे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सायंकाळी ७.३० वाजल्यापासून हा सामना शेख जायेद स्टेडियममध्ये सुरु होईल. मुंबईने सर्वाधिक चार, तर चेन्नईने तीन वेळा विजेतेपद मिळवले आहे. दोन्ही संघ गेल्या वर्षी फायनलमध्ये लढले होते. आता दोन्ही संघ पुन्हा विजयासाठी मैदानात उतरतील. मुंबई इंडियन्सचा संघ विक्रमी पाचवे विजेतेपद मिळवण्यासाठी मैदानात उतरेल तर चेन्नईचा संघ मुंबईच्या विक्रमाशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल. आयपीएलच्या इतिहासात चेन्नई संघाने नेहमी प्लेआॅफमध्ये प्रवेश केला. ते या स्पर्धेचे पाच वेळा उपविजेते ठरले आहेत. त्यानंतर २०१८ साली शानदार कामगिरी करत विजेतेपद मिळवले होते.