Breaking News

IPL 2020 बुमराहमुळे मलिंगाची कमतरता भासणार नाही : ब्रेट ली

 


यूएई : आयपीएलच्या 13 व्या हंगामाला शनिवारी 19 सप्टेंबरपासून सुरुवात यूएईमध्ये सुरुवात होतेय. या 13 व्या हंगामातील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे. चेन्नईचे नेतृत्व महेंद्रसिंह धोनी करणार आहे. तर मुंबईची जबाबदारी रोहित शर्माच्या खांद्यावर असणार आहे. वेगवान बोलर जसप्रीत बुमराहच्या उपस्थितीत मुंबईचा स्टार बोलर लसिथ मलिंगाची कमी जाणावणार नाही, असं ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर ब्रेट लीने एका कार्यक्रमात म्हटलंय. लसिथ मलिंगाने वैयक्तिक कारणामुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे. 


ब्रेट ली काय म्हणाला ?

'जसप्रीत बुमराह नव्या आणि जुन्या अशा दोन्ही बॉलने विकेट घेऊ शकतो. बुमराहच्या या वैशिष्ट्यामुळे मुंबईला मलिंगाची कमी जाणवणार नाही, असं ब्रेट ली म्हणाला. मी बुमराहचा सुरुवातीपासून चाहता आहे. बुमराहची बोलिंगची शैली इतर गोलंदाजांपेक्षा हटके आहे. या हटके शैलीमुळेच बुमराहला बॉल दोन्ही बाजूने स्विंग करता येतो. बुमराह नव्या आणि जुन्या बॉलने नक्कीच चमकदार कामगिरी करुन विकेट मिळवून देईल. तसेच बुमराह अखेरच्या ओव्हरमध्ये कमी धावा देत मलिंगाची कमी जाणवू देणार नाही', असं ब्रेट ली म्हणाला.