Breaking News

भीमा कोरेगावप्रकरणी आठ जणांविरुद्ध 10 हजार पानांचे आरोपपत्र दाखल


Pune : भीमा कोरेगाव दंगल व हिंसचारप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए)ने आठ जणांविरुद्ध 10 हजार पानांचे आरोपपत्र विशेष एनआयए न्यायालयात शुक्रवारी दाखल केले. आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा, हनी बाबू, सागर गोरखे, रमेश गायचोर, ज्योती जगताप, स्टेन स्वामी आणि मिलिंद तेलतुंबडे यांच्यासह आठ जणांविरूद्ध हे आरोपपत्र दाखल झाले आहे.