Breaking News

तालुक्यातील कण्हेर पोखरी येथून 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण !

तालुक्यातील कण्हेर पोखरी येथून 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण


पारनेर प्रतिनिधी -
तालुक्यातील कण्हेर पोखरी येथून एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञाताने अपहरण केल्याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील कण्हेर पोखरी येथून 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या राहत्या घरातून घरातून अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून तिचे कायदेशीर रखवाल ली तून तिला पळवून अपहरण केले आहे याबाबत फिर्याद मुलीच्या आईने पारनेर पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे त्या नुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक वाघ करत आहेत.