Breaking News

नीट परीक्षेचा निकाल 16 ऑक्टोबरला!

 - कोविडमुळे हजर राहू न शकलेल्या विद्यार्थ्यांची 14 तारखेला परीक्षा
- सर्वोच्च न्यायालयाचा विद्यार्थ्यांना दिलासा


नवी दिल्ली : राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) यूजी 2020 चा निकाल 16 ऑक्टोबरला घोषित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राष्ट्रीय चाचणी एजन्सीला दिले आहेत. कोविड -19 किंवा कंटेन्मेंट झोनमध्ये अडकल्यामुळे परीक्षेला हजर होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना 14 ऑक्टोबरला परीक्षेला हजर राहण्याची संधी द्या, असेदेखील न्यायालयाने म्हटले आहे.