Breaking News

मोदींकडे 2.85 कोटींची संपत्ती

 मोदींच्या संपत्तीत 36 लाखांनी वाढ


- अमित शहांना शेअर बाजाराचा फटका

नवी दिल्ली/ प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकूण संपत्तीमध्ये मोठी वाढ झाली आहे. 30 जून 2020 रोजी मोदींची एकूण संपत्ती 2.85 कोटी रुपये एवढी झाली. 2019 च्या तुलनेत त्यांच्या सपत्तीत यंदा तब्बल 36 लाखांनी वाढ झाली आहे. यामुळे आता पंतप्रधानांसह सर्व कॅबिनेट मंत्र्यांनाही संपत्तीचा लेखाजोखा जाहीर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. एकीकडे मोदींची संपत्ती वाढली तर दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा यांना शेअर बाजारातील चढ-उतारामुळे मोठा फटका बसला आहे.

मागच्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपत्ती 2.49 कोटी रुपये होती. त्यांची संपत्ती बँका आणि अनेक इतर सुरक्षित साधनांमध्ये गुंतवणूक झाल्यामुळे वाढली आहे. बँकांमधून त्यांना तब्बल 3.3 लाख परतावा मिळाला आहे. तर इतर साधनांमधून 33 लाख रुपये मिळाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतेही कर्ज घेतलेले नाही. त्यांच्या नावावर एकही गाडी किंवा इतर वाहन नाही. मोदींकडे तब्बल 45 ग्रॅम सोन्याच्या 4 अंगठ्या आहेत, ज्याची किंमत 1.5 लाख रुपये आहे. गृहमंत्री अमित शहा हे गुजरातच्या एका श्रीमंत कुटुंबातून आहेत. पण शेअर बाजारात चढ-उतार होत असल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जून 2020 पर्यंत अमित शहा यांची घोषित संपत्ती 28.63 कोटी होती. मागच्या वर्षी भाजपच्या अध्यक्षांच्या रुपात त्यांनी आपली संपत्ती 32.3 कोटी घोषित केली होती.