Breaking News

पारनेर तालुक्यात आज ४३ अहवाल पॉझिटिव्ह !

पारनेर तालुक्यात आज ४३ अहवाल पॉझिटिव्ह.

कान्हूर पठार येथे वाढत आहे कोरोना रुग्ण संख्या नागरिकांचे मात्र दुर्लक्ष.


पारनेर प्रतिनिधी -
पारनेर तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे आज प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी च्या अहवालानुसार ४३ व्यक्तींना कोरोना ची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या ही सतराशे पार झाली आहे यापैकी एकूण ३३ व्यक्तींचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे
तालुक्यामध्ये कोरोना चाचणी चे प्रमाण वाढले आहे तसेच चाचणी जास्त प्रमाणात होत असल्याने रुग्णांची संख्याही वाढत आहे माझी जबाबदारी माझे कुटुंब या माध्यमातून देखील प्रत्येक कुटुंबाची तपासणी तालुक्यात केली जात आहे यामुळे गेल्या काही दिवसापासून रुग्ण संख्याही वाढत आहे.
आज प्राप्त झालेल्या पॉझिटिव्ह अहवालामध्ये कान्हूर पठार १० सुपा २ पानोली १ पारनेर शहर ४ पिंपरी जलसेन २ हिवरे कोरडा २ आळकुटी १ जाधव वाडी (पाडळी दर्या ) २ टाकळी ढोकेश्वर ६ गोरेगाव १ वासुंदे २ विरोली १ जवळा २ देवीभोयरे २ कर्जुले हर्या २ भाळवणी ३ या गावातील व्यक्तींचा पॉझिटिव्ह अहवालामध्ये मध्ये समावेश आहे.
तालुक्यातील कान्हुर पठार या ठिकाणी रुग्ण संख्या वाढत आहे मात्र येथील नागरिक याबाबत गांभीर्याने घेत नाहीत अनेक नागरिक हे सार्वजनिक ठिकाणी विनामास्क विनाकारण फिरत असतात पोलिसांनी वेळोवेळी कारवाई केली आहे रुग्ण संख्या वाढत असताना प्रशासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करण्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष होत आहे तसेच तालुक्यातील भाळवणी सुपा टाकळी ढोकेश्वर जवळा पारनेर शहर या भागातही सातत्याने कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.