Breaking News

कोपरगाव तालुक्यात २० रुग्णाची वाढ तर १९ कोरोनामुक्त !

कोपरगाव तालुक्यात २० रुग्णाची वाढ तर १९ कोरोनामुक्त
---------
रुग्ण संख्या घटती
----------
तालुक्याला काहीसा दिलासा


करंजी प्रतिनिधी-
आज दिनांक १ ऑक्टोबर रोजी कोपरगाव कोविड सेंटर मध्ये एकूण १२४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २०  बाधित तर १०४ अहवाल निगेटीव्ह आढळून आल्याची  माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर

धारणगाव रोड-१
जुने पोस्ट ऑफिस-१
निवारा-१
लक्ष्मी नगर-१
महादेव नगर-१
संभाजी चौक-२
गुलमोहोर कॉलनी-१

तर ग्रामीण मधील पुढील प्रमाणे 

वेळापूर-५
माहेगाव देशमुख-४
अंजनापूर-१
कोळपेवाडी-१
जेऊर पाटोदा-१

असे आज १ ऑक्टोबर रोजी कोपरगाव तालुक्यात एकूण २० अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आढळून आले आहे.

   आज रोजी कोपरगाव तालुक्यातील १९ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.

आज नगर येथे पुढील तपासणीसाठी ४१ संशयितांचे घशातील नमुने पाठवण्यात आले आहे.

आज अखेर कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या १८५६ तर ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १३० झाली आहे.

 आज पर्यंत कोपरगाव  तालुक्यातील  एकूण कोरोनामुळे मयत  झालेल्या रुग्णाची संख्या ३३  झाली आहे.