Breaking News

देशातील बलात्कार थांबणार नसतील तर महिलांना शस्र बाळगण्याची परवानगी द्या - राजेश्वरी कोठावळे

देशातील बलात्कार थांबणार नसतील तर महिलांना शस्र बाळगण्याची परवानगी द्या - राजेश्वरी कोठावळे
------------
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील बलात्कार व हत्या प्रकरणी पारनेर तालुक्यातील महिलांनी निषेध व्यक्त केला.
----------
सुपा येथील नगर पुणे हायवे वर महिलांनी केले रस्ता रोको आंदोलन.


पारनेर प्रतिनिधी- 
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील  तरुणीवर झालेल्या सामुहिक बलात्कार व हत्याप्रकरणी उत्तर प्रदेश सरकार तसेच केंद्र सरकार कोणतीही ठोस भूमिका घेत नाही झालेल्या या घटनेबाबत निषेध व्यक्त करत तसेच आरोपींना फाशीची शिक्षा द्या या मागणी साठी तालुक्यातील महिलांनी नगर पुणे महामार्ग याठिकाणी रस्ता रोको आंदोलन केले यावेळी महिलांच्या भावना तीव्र होत्या त्यामुळे पोलीस प्रशासन व महिला यांच्यामध्ये काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी महिलांचे म्हणणे जाणून घेऊन त्याबाबत पाठपुरावा करू असे आश्वासन देत आंदोलन थांबवण्याची विनंती केली व महिलांनी ती मान्य करत आंदोलन मागे घेतले.


उत्तर प्रदेश मधील हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणी तेथील राज्य सरकार व केंद्र सरकार आरोपींना पाठीशी घालत आहेत असेच माध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रकार तेथे होत आहे त्या दलित कुटुंबाला न्याय व निर्भया'ला न्याय मिळवून देण्यासाठी पारनेर तालुक्यातील महिलांनी सुपा येथे नगर पुणे हायवे वर रस्ता रोको आंदोलन केले यावेळी काही वेळ रास्ता रोको करण्यात आला यावेळी राजेश्वरी कोठावळे यांनी केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला तसेच देशातील बलात्कार थांबणार नसतील तर महिलांना शस्त्र बाळगण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली. 


तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या विषयावर गप्प का आहेत असा सवाल यावेळी महिलांनी उपस्थित केला तसेच महिलांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांना  बांगड्यांचे पार्सल व निवेदन यावेळी दिले तसेच हे पार्सल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पर्यंत पाठवावे व त्याची पोहोच आम्हाला मिळावी अशा प्रकारची मागणी यावेळी राजेश्वरी कोठावळे यांनी लावून धरली आंदोलन बराच वेळ चालू असल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी आपण हे निवेदन केंद्रीय मंत्र्यांपर्यंत पोहोचवू अशा प्रकारचे आश्वासन दिले त्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले मात्र महिलां वर होणारे बलात्कार थांबणार नसतील तर यापुढे तीव्र आंदोलन केले जाईल अशा प्रकारचा इशारा महिलांनी दिला तसेच तालुक्यात अनेक घटना महिलांच्या बाबतीत घडत आहेत त्याबाबत तालुका पोलिस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे व अपहरण व बलात्काराच्या घटना त्वरित निकाली काढाव्यात अशा प्रकारची मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी रोहिणी वाघमारे शुभांगी पठारे राजश्री पवार प्रांजल शिंदे सुमन कोठावळे प्रणाली सरोदे मयुरी शिंदे निकिता औटी पल्लवी औटी प्राजक्ता गाडगे सानिया शेख मुस्कान सय्यद आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या


  हाथरस येथील माझ्या बहिणी वर झालेल्या अन्याय व अत्याचार केल्याप्रकरणी आरोपींना त्वरित शिक्षा झाली पाहिजे तेथील पोलिस प्रशासनाने नातेवाईकांना कुठलीही माहिती न देता तीचा अंत्यविधी का केला देशातील बलात्कार थांबले नाही तर यापुढे महिला स्वतःचे संरक्षण करतील फक्त स्वतःचे संरक्षण करण्यासाठी महिलांना शस्त्र बाळगण्याची परवानगी द्या !
----------
राजेश्वरी कोठावळे
आंदोलक