Breaking News

पोखरी सोसायटी च्या मनमानीला कंटाळून तीन गावातील ग्रामस्थांचे अमरण उपोषण !


पोखरी सोसायटी च्या मनमानीला कंटाळून तीन गावातील ग्रामस्थांचे अमरण उपोषण !
---------------------
महात्मा गांधी जयंती पासून 
---------------------
उपोषणाला ग्रामस्थ करणार आहेत सुरुवात.
--------------------
सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गाजरे यांची माहिती.


पारनेर प्रतिनिधी - 
    पोखरी विविध कार्यकारी सोसायटी  चेअरमन व संचालक मंडळाने गेल्या अनेक वर्षापासून मिळालेल्या नफ्यातून सभासदाना लाभांश वाटप करावा  सभासदाकडून जमा केलला  इमारत निधी लोकाना पारदर्शक पणे दाखवून त्यातून इमारत बांधावी संस्थेने खत बी-बियांन व कीटकनाशक(कृषी निविष्ठा)दुकांन चालू करावे. सभासदाना विचारत न घेता परस्पर निर्णय घेणे बंद करावा.या प्रमूख मागणीसाठी 2 तारखे पासुन खडकवाडी येथे सकाळी 9.00 वाजता अमरण उपोषण करणार आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गाजरे यांनी दिली आहे.
या मध्ये म्हटले आहे की म्हसोबाझाप,पोखरी,वारणवाडी या तीन गावामिळून ही सोसायटी आहे कार्यालय खडकवाडी येथे आहे या गावातील लोकांना सतरा ते अठरा किलोमीटर अंतर पार केल्यानंतर सोसायटीत जावे लागते यात सभासदांचा वेळ व पैसा वाया जातो यासाठी कार्यालय पोखरी येथे व्हावे  सभासदांना लाभांश वाटप करण्यात यावे या आशयाचे निवेदन यापूर्वी दिले होते मात्र येथील म्हसोबा झाप वारणवाडी म्हसोबाझाप तीन ग्रामपंचायत मिळून साधारण बाराशे ते तेराशे सभासद असून संस्थेला 84 लाख रुपये इतका नफा झाला संस्थेला स्थापन होऊन 65 वर्षे झाली असून आजपर्यंत एकही रुपयाचा लाभास सभासदांना दिला नाही इमारत निधी सभासदांकडून गोळा केला असून तो निधी गेला कुठे त्याचे काय झाले याबाबत देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे 65 वर्षांमध्ये संचालक व त्यांच्यावर अंकुश ठेवणारे यांनी संस्था संस्थेसाठी काय केले जाणीवपूर्वक अंगठे बहादूर संचालक बॉडी मध्ये ठेवले सभासदांनी 65 वर्षे आपल्यावर जो विश्वास ठेवला त्या मोबदल्यात तुम्ही पदाधिकारी म्हणून सभासद व संस्थेसाठी काय केले या उलट संस्था खिळखिळी करून आजपर्यंत इमारत सुद्धा बांधली नाही 
 या दिवाळीला लाभांश वाटप करण्यात येईल असे लेखी निवेदन देण्यात यावे अन्यथा दोन ऑक्टोबरपासून सोसायटी कार्यालय खडकवाडी या ठिकाणी बेमुदत उपोषण करण्यात येईल असे या निवेदनात म्हटले आहे याबाबतचे निवेदन त्यांनी पोखरी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन तसेच सहाय्यक निबंधक पारनेर पोलीस स्टेशन पारनेर ला दिले आहे.
या निवेदनावर कारभारी काका आहेर,विलास गाजरे,भाऊसाहेब हांडे(माजी चेरमन),सावकार रोहकले,बाबाजी रोहकले,बन्सी आरोटे,झांबर दरेकर ,लहुशेठ वाळुज,माऊलीशेठ बेलकर,उत्तमशेठ गुजाळ,भाऊशेठ हांडे,कैलास आगळे,संतोष हांडे, विलास आहेर,बाळासाहेब वाळुज,संतोष हांडे,बबन गिरी,रेवजी दरेकर,पाडूरंग भालके,सौ.कविता शांताराम बेलकर,कुंडलिक पाटील, बाळासाहेब शिंदे,भाऊसाहेब चौधरी,जनर्धन कशिद,एकनाथ कोकाटे,बाबाजी कशिद,दिनकर कोकाटे,बबन कशिद, तुकाराम शिंदे ,श्रीरंग पाटील, पंडित पवार, साहेबराव करंजेकर, अशोक आहेर, सिताराम पवार, भाऊसाहेब गोविंद पवार ,गणपत रामू पवार, कासम मोमीन ,रफिक पटेल, लतीफ पटेल  ,माणिकलाल गांधी लहानु वाकळे, बबन वाकळे, पोपटराव वाकळे ,बाळू कांबळे यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

 संस्था 84 लाखाला नफ्यात आहे त्यामुळे सभासदांना डिव्हीडंट वाटप करावा संस्थेची इमारतीचे बांधकाम करावे संस्थेच्या नफ्यातून खते बी-बियाणे चे दुकान कपड्याचे दुकान किंवा अजून काही वेगळे उपक्रम राबवावेत संस्थेचा वापर करून घेतला जातो त्यामध्ये सभासदांना वाऱ्यावर सोडले जाते यामध्ये संचालक मंडळाने त्वरित लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा या उपोषणाला एक हजार लोकांचा पाठिंबा असणार आहे सभासदाच्या मागणीसाठी आमरण उपोषण करत आहे जास्त गर्दी न करता सोशल डिस्टन्स पालन करून उपोषण केले जाणार आहे.
-----------------------
प्रकाश गाजरे 
अध्यक्ष, संघर्ष ग्रुप