Breaking News

"हाथरस, बलरामपूरच्या घटना दुर्दैवी, महाराष्ट्रात हे सहन करणार नाही"

 


मुंबई | उत्तर प्रदेशमध्ये हाथरस आणि बलरामपूरमध्ये अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठोकपणे अशा नराधमांना इशारा दिला आहे.

महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार काय कुणी वाकड्या नजरेनं पाहिलं तरीही सहन होणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाचा डीजिटल उद्घाटन सोहळ्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, सध्या उत्तर प्रदेशमधील दोन घटनांमुळे देश हादरून गेला असून संचापाची लाट उसळली आहे.