Breaking News

पारनेर तालुक्यातील काल २३ अहवाल पॉझिटिव्ह, तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या स्थिरावली!

पारनेर तालुक्यातील काल २३ अहवाल पॉझिटिव्ह, तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या स्थिरावली!
-----------
संशयित रुग्णांचे कोरोना चाचणी साठी स्राव देण्याचे प्रमाण मंदावले.


पारनेर प्रतिनिधी -
पारनेर तालुक्यातील दि. आठ रोजी कोरोना चाचणी च्या अहवालानुसार २३ व्यक्तींना कोरोना ची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
गेल्या काही दिवसापासून तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही स्थिरावली आहे त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे कोरोना रुग्ण हे सातत्याने काही गावांमध्ये सापडत आहेत त्यामुळे अजूनही काळजी घेणे गरजेचे आहे.
तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयित व्यक्ती कोरोना चाचणी करण्यासाठी पुढे येत नाहीत त्यामुळे संपर्कात येऊनही अनेक जण चाचणी करत नाहीत हे सध्या कोरोना रुग्णांची संख्या मंदावल्याचे प्रमुख कारण असल्याचे समजते.
यापूर्वी तालुक्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यास त्याच्या संपर्कात आलेल्या अनेक जणांची कोरोना चाचणी त्वरित घेतली जायची मात्र सध्या तसे होताना दिसत नाही संशयित रुग्णाला लक्षणे अगर काही प्रमाणात त्रास जाणवत असेल तरच तो व्यक्ती चाचणीसाठी पुढे येत आहे.
प्राप्त झालेल्या पॉझिटिव्ह अहवालामध्ये वाडेगव्हाण ३ कान्हूर पठार ४ पारनेर शहर ७ रांजणगाव मशीद १ वडझिरे १ राजुरी २ वासुंदे १ भांडगाव १ भोंद्रे १ ढवळपुरी १ निघोज १ या गावातील व्यक्तींचा समावेश आहे.