Breaking News

विश्वनाथ कोरडे माजी जि. प. सदस्य यांची महसूल प्रशासनाच्या कारवाईच्या पत्रानंतर आंदोलनाची धार कमी!

विश्वनाथ कोरडे माजी जि. प. सदस्य यांची महसूल प्रशासनाच्या कारवाईच्या पत्रानंतर आंदोलनाची धार कमी!
--------------------
 जागरण गोंधळ आंदोलना ऐवजी कोरडे करणार आता एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण.
---------------
तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे व्हावे मागणी.
-----–---–-
कोरडे यांनी तहसील कार्यालयात जागरण गोंधळ आंदोलन करण्याचा दिलेला इशारा हा फक्त इशाराच राहिला


पारनेर प्रतिनिधी - 
      जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी तहसील कार्यालय मध्ये जागरण गोंधळ आंदोलन दि १२ रोजी करणार असल्याचे पत्र तहसीलदार कार्यालयामध्ये दिले होते. त्यानुसार तहसीलदार ज्योती देवरे यांनी कोरोना पार्श्वभूमीवर प्रशासनाचे नियम डावलून जागरण गोंधळ आंदोलन केल्यास कारवाई केली जाईल अशा आशयाचे पत्र कोरडे यांना दिल्यानंतर कोरडे यांनी आपल्या आंदोलनाची भूमिका बदलली आहे. त्यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचे व शांततेच्या मार्गाने करण्याचे पत्र तहसीलदार ज्योती देवरे यांना दिले आहे.
यामध्ये पत्रात म्हटले आहे की आपण कायद्याचा मान राखून आपल्या आंदोलनाचे स्वरूप बदलून एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचे नियोजन केले आहे. संपूर्ण आंदोलन शांततेच्या मार्गाने होईल आंदोलनाचा हेतू राजकीय नसून कुठल्याही विशिष्ट राजकीय पक्षाचे प्रतिनिधीत्व मिळण्याचा नाही. अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुसकान भरपाईचे पंचनामे अजुनही कुठेही सुरु झालेली नसून हे पंचनामे सरसकट करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.  या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. उलट सर्वच राजकीय पक्षांनी या मागणीला पाठिंबा द्यावा ही मागणी मी करणार आहे. तसेच शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणे हे आमचे उद्दिष्ट असून कोरोना संसर्गाच्या काळामध्ये सर्व प्रकारचे नियम पाळूनच आंदोलन करण्यात येईल आपल्या पत्रानुसार आपण आदेश दिलेले असले तरी अतिवृष्टीचा लागू केलेला विशिष्ट पर्जन्यवृष्टीचा नियम बदलण्यात येऊन सर्व नुसकान ग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी करून पंचनामे करावेत अशाप्रकारे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.
     त्यामुळे माझी जि.प. सदस्य विश्‍वनाथ कोरडे यांनी तहसील कार्यालयात जागरण गोंधळ आंदोलन करण्याचा दिलेला इशारा हा फक्त इशाराच राहिला आहे.  प्रशासनाच्या नियमांमध्ये आंदोलन केले जाईल असे कोरडे यांनी या पत्रांमध्ये स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोरडे यांच्या आंदोलनाची धार कमी झाली आहे का हे आंदोलनानंतरच स्पष्ट होईल. कोरडे यांना तहसील कार्यालयातून गोंधळ घातल्यास कारवाई केली जाईल अशा प्रकारचे पत्र तहसीलदार यांनी पाठवल्यानंतर कोरडे यांनी ही मवाळ भूमिका घेतली आहे. तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे तर काही शेतकऱ्यांनी नुकसान झालेले पिकेही शेताबाहेर काढून दुसऱ्या पिकाचे नियोजन केले आहे. मग त्या पिकाचा पंचनामा काय होणार असा सवाल उपस्थित होतो आहे.

....