Breaking News

केंद्र व राज्य सरकार निधी आणून तालुक्याच्या विकासाठी प्रयत्न - सुजित झावरे

केंद्र व राज्य सरकार निधी आणून तालुक्याच्या विकासाठी प्रयत्न - सुजित झावरे
------------
पाणी , आरोग्य,रस्ते ही ग्रामीण भागातील त्रिसूत्री - सुजित झावरे 


पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यातील वासुंदे येथील सुजित झावरे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या जेडगुले/लाखे/ साठे वस्ती नळपाणी पुरवठा योजनेचे शुभारंभ  सुजित झावरे पाटील यांचे हस्ते करण्यात आले.
 यावेळी सुजित झावरे पाटील म्हणाले की, तालुक्यातील पाणी, आरोग्य रस्ते ही ग्रामीण भागातील त्रिसूत्री आहे. व त्यावर प्रामुख्याने काम केले तर  तालुका नक्कीच विकासात्मक दृष्टीने पुढे जाणार आहे  भविष्यात आपण त्यावरच लक्ष केंद्रित करणार आहे यासाठी केंद्र व राज्य सरकार कडून तालुक्यातील विकास कामासाठी भरीव निधी आणून तालुक्याचा विकास कसा करता येईल हे आपले प्रयत्न असणार आहे. प्रामुख्याने तालुक्यात जलसंधाणाचे कामे करून  दुष्काळी तालुकाची ओळख पुसणाचे काम करायचे आहे. यावेळी बा ठ झावरे, दिलीपराव पाटोळे, लहान भाऊ झावरे पोपट ठुबे, भाऊसाहेब सैद, मारुती उगले सर, तळेकर गुरुजी, धोंडिभाऊ ठुबे, राजेंद्र आहेर, बाळासाहेब टोपले, किसन गांगड, भाऊसाहेब जगदाळे, रामचंद झावरे, शिवाजी बर्वे, संदीप झावरे,पै.गणेश शिरतार, धोंडिभाऊ शिरतार,  रामदास शिरतार, खंडू शिरतार, तुकाराम शिरतार, नामदेव जेडगुले, मयूर शिरतार, कुलदीप शिरतार,युवराज मदने, कृष्णा सोनवणे, दत्ता शिरतार, श्रीपती जेडगुले,संतोष गांगड, विकास टोपले, अक्षय जेडगुले, प्रणेश शिरतार, सरुबाई शिरतार, मंदा गोफणे, सविता जेडगुले, कविता जेडगुले, अश्विनी गोफणे, रोहिणी शिरतार, लताबाई शिरतार, कोंडीबा शिरतार,  विठ्ठल झावरे, संदेश झावरे, संग्राम झावरे, सचिन साठे, प्रवीण झावरे, समीर कंदलकर, साहेबराव गुंजाळ, भागचंद मदने मेजर ग्रामसेवक भाऊसाहेब लोंढे उपस्थितीत होते.