Breaking News

महावितरणकडून विजबिलात ग्राहकांची दिशाभूल.

महावितरणकडून विजबिलात ग्राहकांची दिशाभूल.
----------
जगण्यासाठीच्या संघर्षात महावितरणचा शॉक


कोपरगाव प्रतिनिधी-
टाळेबंदीने अनेकांचे उद्योग बंद झाले.हातांचे काम निघुन गेले त्यात रोटीरोजीची समस्या सर्वांना सतायला लागली.अशावेळी महावितरण कंपनीने टाळेबंदीत व्यावसायिक बिलांची देय रक्कम तिन महिने  शून्य दाखवल्यामुळे  सध्या हि  दिशाभूल चांगलीच चव्हाट्यावर आली असुन याबाबत कार्यालयात गाऱ्हाणे मांडणांरांची संख्या दैनंदिन वाढतच असुनही कर्मचारी मात्र राज्य  सरकारवर ढकलून हात वर करत असल्याने ग्राहकांत संतापाची लाट उसळली आहे.
          कोपरगाव महावितरण ग्रामीण  कार्यालयाच्या अधिपत्याखाली ६०गावे येतात. ग्रामीण भागात टाळेबंदित अत्यावश्यक सेवा वगळता बहुतांशी उद्योग बंदच होते. या काळात व्यावसायिकांना दरमहा येणारी विजदेयके महावितरणने शून्य दिले होती. ग्राहकांना या काळात आपण मोठा दिलासा असल्याचा फार्स करत सरकार आणि महावितरण कंपनीने केला.त्यासाठी अनेक व्यावसायिकांना खरोखर मनाला दिलासा वाटला.मात्र अल्पावधीतच या सुखद धक्क्यावर सध्यातरी पाणी पडले आहे.टाळेबंदीत  बंद झालेले उद्योग अद्यापही  ते बंदच आहे ,अजुनही गाडी रुळावर आलेली नसताना आता मात्र महावितरणने त्या काळातील तिन महिन्यांची बिल देयकांचा तथा मीटरभाडे सह इतर करांचा धोंडा ग्राहकांच्या गळ्यात बांधला आहे.याचा व्यावसायिकांना चांगलाच मनस्ताप करण्याची वेळ आली आहे.घरगुती बिलांतही मोठी कर आकारणी करुन महावितरण कंपनीने ग्राहकांना सध्यातरी चांगलाच शॉक दिला आहे.
            

टाळेबंदी काळातील तिन महिन्यांची विजदेयकांची फिक्स चार्जेस या महिन्यांच्या बिलात लावली असुन ते सरकारचे धोरण असल्याने याबाबत आम्ही काहीच करु शकत नाही.हा नियम संपुर्ण राज्यासाठीच लावलेला आहे.
------------
डी. बी. गोसावी कार्यकारी, अभियंता,विज महावितरण कंपनी,संगमनेर

 महावितरण कंपनीने टाळेबंदी काळात माहे.एप्रिल,मे,जुन विजबिले शून्य का दिली?महावितरण तथा राज्य सरकारने बिल माफीचा बडेजाव करुन आता मागिल बिले एकरकमी देऊन हि ग्राहकांची दिशाभूल कशासाठी केली?अशे अनेक प्रश्न ग्राहकांनी उपस्थित केले आहे.