Breaking News

पारनेर येथे चोरून वाळू वाहतूक प्रकरणी एका डंपरवर पोलिसांची कारवाई.

पारनेर येथे चोरून वाळू वाहतूक प्रकरणी एका डंपरवर पोलिसांची कारवाई.
----------------
12 लाखाचा मुद्देमाल जप्त मालक व चालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल.
पारनेर प्रतिनिधी-
 पारनेर येथील लोणीरोडवर कानिफनाथ मळा येथे एक डंपर विना परवाना बेकायदा कायदा शासकीय वाळूची चोरी करून वाहतूक प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत चालक व मालक दोघांविरोधात पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. १ रोजी ११:३० सुमारास पोलीस कॉन्स्टेबल शरद देवीदास गावडे हे पारनेर शहरात पेट्रोलिंग करत असताना पारनेर ते लोणी हवेली जाणारे रोडवर वस्ती कानिफनाथ मळा तालुका पारनेर येथे डंपर नंबर एम एच १६सीसी ९८८९ ही वरील चालक दत्तात्रय पांडुरंग साळुंखे राहणार शिंदे मळा वडगाव सावताळ तालुका पारनेर हा डंपर मालक सुहास ज्ञानदेव औटी पारनेर यांचे सांगण्यावरून व त्याचे आर्थिक फायद्याकरता विनापरवाना बेकायदा डंपरमध्ये चार ब्रास शासकीय वाळूची चोरून वाहतूक करताना मिळून आला या कारवाईमध्ये डंपर  चार ब्रास वाळू असा एकूण बारा लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे शरद देवीदास गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी पद्मने करत आहेत.