Breaking News

उपनगराध्यक्ष बागुल यांचा आज राजीनामा, आता संधी कोणाला?

उपनगराध्यक्ष बागुल यांचा  आज राजीनामा, आता संधी कोणाला?


कोपरगाव शहर प्रतिनिधी :  
ठरल्याप्रमाणे  कोपरगाव नगरपरिषदेचे शिवसेनेचे उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांनी आज दि ८ ऑक्टोबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा  मुख्यधिकारी मेडिकल रजेवर असल्याने प्रभारी मुख्याधिकारी  म्हणून कारभार पाहत असलेले नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांचेकडे सादर केला आहे.

   उपनगराध्यक्ष बागुल यांनी एका वर्षासाठी भाजप-सेना युतीचे उमेदवार म्हणून  उपनगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला होता त्यामुळे पक्षांतर्गत ठरल्याप्रमाणे त्यांनी पक्षश्रेष्ठी च्या आदेशानुसार आज राजीनामा सादर दिला आहे.
 
  त्यामुळे आता बागूल यांच्या राजीनाम्यानंतर शेवटच्या एका वर्षासाठी कोणाच्या गळ्यात पक्षश्रेष्ठी उपनगराध्यक्ष पदाची माळ टाकतात  याकडे आता संपूर्ण शहर वासियाचे लक्ष लागले आहे. यात प्रामुख्याने नगरसेवक जनार्दन कदम स्वप्निल निखाडे आरिफ भाई कुरेशी व महिला सदस्यांपैकी  विद्याताई सोनवणे यांची नावे उपनगराध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे.