Breaking News

पारनेर शहरामध्ये महाराजस्व अभियान अंतर्गत तहसीलदार यांनी अनाधिकृत वापराबाबत केली पाहणी !

पारनेर शहरामध्ये महाराजस्व अभियान अंतर्गत तहसीलदार यांनी अनाधिकृत वापराबाबत केली पाहणी.
-------------
शर्तभंग अतिक्रमणे अनाधिकृत वाणिज्य वापर या गोष्टी शोधून त्यांच्यावर कारवाई ची प्रक्रिया.
--------------
शासनाच्या जागेवर जुगार अड्डा महसूल पथकाची जुगाऱ्यावर कारवाई.


पारनेर प्रतिनिधी - 
महाराजस्व अभियान राबवण्यात येणार आहे. पारनेर येथे त्याची सुरुवात केली महाराजस्व अभियानांतर्गत लोकाभिमुख घटक जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी यांचे नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयापासून गावपातळीपर्यंत प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. याअंतर्गत तहसीलदार ज्योती देवरे यांनी पारनेर येथे शिवारफेरी कार्यक्रम आयोजित या मोहिमेअंतर्गत शर्तभंग अतिक्रमणे अनाधिकृत वाणिज्य वापर या गोष्टी शोधून त्यांच्यावर कारवाई ची प्रक्रिया करण्यात आली आहे. पारनेरमध्ये पाहणी करत असताना नगराध्यक्ष वर्षा नगरे या सह शहरातील नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी या पथकाने अनाधिकृत बांधकामे शासकीय जागेवरील अतिक्रमण ज्या कब्जा हक्काने जागा दिल्या त्यामध्ये खरेदी विक्री संघ त्या जागेवर त्यांनी गाळ्याचे बांधकाम केले आहे काही वतनाच्या जागेवर शर्तभंग जमिनीचा वस्तुनिष्ठ लेखाजोखा मांडण्याचे काम करण्यात आले.


ही पाहणी करीत असताना शासकीय जागेवर पत्र टाकून जुगारी अड्डा सुरू होता. त्यावर तहसीलदार यांच्या पथकाने छापा टाकला जुगार व मटका यांच्याशी संबंधित होते. त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले पोलीस त्यांच्यावर पुढील कारवाई करणार आहेत या अभियानांतर्गत पारनेर शहरातील 45 अतिक्रमणे दोनशे अनाधिकृत वाणिज्य वापर दोन शर्तभंग केल्याचे आढळून आले गणपती देवस्थानच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात वाणिज्य वापर सुरू आहे  वखारी साठी जी कब्जा हक्काने दिलेली जागा त्या जागेमध्ये हॉटेल व्यवसाय सुरू होता ती जमीन शासन जमा करून घेण्याचा प्रस्ताव करण्यात येणार आहे अशी माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली.


बाजार समितीमध्ये अनेक गाळे आहेत त्यांनी वाणिज्य दंड भरावा अशा सूचना करण्यात आल्या आहेत नगरपंचायतीचे गाळे आहेत त्यांनी वाणिज्य दंड भरावा तहसील कार्यालयाच्या आजूबाजूला शासकीय जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहेत यांनादेखील महाराष्ट्र जमीन अधिनियम चे कलम 50,2 अन्वये नोटीस देऊन त्यातील अतिक्रमण निष्कासन करून घेण्यात येणार आहे गावठाण हद्दीमधील अतिक्रमण भूकंप मापक च्या देवर मॅडम यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमून मोजमापे घेऊन गावठाण हद्दीमध्ये अनाधिकृत वाणिज्य वापर यांच्यावर दंडात्मक प्रक्रिया राबवून त्याचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.


सामाजिक बांधकाम विभाग देवकुळे यांना 10 ऑक्टोबर 2013 च्या शासन निर्णय प्रमाणे ज्या शासकीय जमिनी हस्तांतरित करण्यात आलेल्या आहेत त्या विभागप्रमुखांनी त्या शासकीय जमिनी व अतिक्रमण होणार नाही यासंदर्भात लक्ष ठेवायचे विभागप्रमुखांनी अतिक्रमणाबाबत टाळाटाळ केली तर संबंधित विभाग प्रमुखावर कारवाई करण्याचे अधिकार तहसिलदारांना आहेत रस्त्याच्या बाजूला पंधरा मीटरपर्यंत रोडला लागून अतिक्रमणे झाले आहेत यामध्ये तहसील कचेरी च्या समोरील अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात आहेत तेथे वाहतूक कोंडी नियमित होत असते अशी अतिक्रमणे तत्काळ काढून टाकण्याची कारवाई त्यांच्या स्तरावरून करावी अशा सूचना तहसीलदार यांनी बांधकाम विभागाला दिल्या आहेत अतिक्रमण धारकांच्या याद्या तयार आहे तात्काळ यावर कारवाई केली जाणार आहे असे देवकुळे यांनी सांगितले आहे. ईदगाह मैदान देखील शासकीय जागेवर आहे तेसुद्धा निष्कासन करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

 मोहिमेअंतर्गत शिवार फेरी  करत असताना मुख्याधिकारी यांनी उपस्थित राहणे गरजेचे होते 
नगरपंचायत हद्दीतील अतिक्रमणे मुख्याधिकारी यांनी काढणे अपेक्षित आहे मात्र अभियानांतर्गत तहसीलदार यांनी मोहीम काढून संबंधित अतिक्रमणांचे पंचनामे केल्याने शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे शहरामध्ये अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे मात्र शहरातील मोहीमे वेळी मुख्याधिकारी यांची अनुपस्थित चर्चेचा विषय झाला.

 तालुक्याच्या तसेच गावाच्या भूसंपत्तीचे
अचूक व्यवस्थापन व नियमन करण्याच्या दृष्टीने शिवारफेरीचा कार्यक्रम घेणे अत्यंत आवश्यक आहे.जमीन व जमीन वापराचे वस्तुनिष्ठ नियोजन हे शिवारफेरीच्या परिणामकारक अंमलबजावणीवर अवलंबून असून त्यात गावपातळीवरील सर्व कार्यकारी घटकांचा सहभाग महत्त्वाचा आहे.ग्रामपातळीवरील प्रशासकीय घटक तसेच हितसंबंधित व्यक्ती म्हणजेच शेतकरी व ग्रामस्थ यांचे सहभागातून सजगतेने केलेल्या शिवारफेरीतून गावातील जमीन व जमीन वापराचा मांडण्यात आलेला वस्तुनिष्ठ लेखाजोखा हा शिवारफेरी कार्यक्रमाचा गाभा आहे.
त्यानुसार गटनिहाय, गावनिहाय शिवारफेरी करून, जमीन व जमीन वापर पध्दती तसेच पाणी पुरवठ्यांची साधने, जलसिंचनाच्या नोंदी, पिकांच्या नोंदी इ. घटकांची " अचूक व परिपूर्ण" माहिती शिवारफेरीच्या माध्यमातून संकलित करुन गाव नमुने १ ते २१ अद्ययावत करण्यात यावेत. प्रत्येक गावात शिवारफेरी कार्यक्रम राबविताना तपासण्यात येणा-या प्रचलित घटकांव्यतिरिक्त खालील घटकांचा समावेश आहे.

पारनेर मध्ये महाराजस्व अभियान अंतर्गत शिवारफेरीचे आयोजन करण्यात येऊन शासकीय जागांवरील अतिक्रमण अनाधिकृत वाणिज्य वापर गावठाण हद्दीतील अनाधिकृत वाणिज्य वापर  कब्जेहक्काचाया जागांवरील फलक इनाम वतन जागांवर वाणिज्य वापर रस्ता खुला करणे शेतीगटांची पीकपाहणी फळबागा पाणीपुरवठ्याच्या साधनांच्या नोंदी पडताळणी, याबाबत संपुर्ण पाहणी करुन जमीन वापराचा संपुर्ण लेखाजोखा करणे सुरु करण्यात आले आहे.
-------------
 ज्योती देवरे 
तहसीलदार पारनेर