Breaking News

सदिच्छा मंडळात अखेर फूट पडली पारनेर तालुक्यातील अनेक पदाधिकार्‍यांचे राजीनामे.

सदिच्छा मंडळात अखेर फूट पडली पारनेर तालुक्यातील अनेक पदाधिकार्‍यांचे राजीनामे.
-------------------
शिक्षक नेते गोकुळ कळमकर यांच्या पाठोपाठ सदिच्छा मंडळातील पारनेर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे.
-----------------
शिक्षक बँकेच्या निवडणुकीच्या तोंडावर सदिच्छा मंडळात मोठा भूकंप.
--------------
सर्व सभासद कार्यकर्त्यांशी बोलून भविष्यातील वाटचालीबाबत निर्णय घेऊ गोकुळ कळमकर यांची माहिती.


पारनेर प्रतिनिधी - 
शिक्षक संघाचे राज्याचे  माजी आमदार कै.शिवाजीराव पाटील गटांमध्ये अनेक वर्षं काम करत असलेले गोकुळ कळमकर यांनी एक महिन्यापूर्वी अहमदनगर जिल्हा संघ व जिल्हा सदिच्छा मंडळातील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर पारनेर तालुक्यातील त्यांचे नेतृत्व मानणाऱ्या शिक्षक संघ सदिच्छा मंडळातील अनेक पदाधिकाऱ्यांनी सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामा दिले यामुळे शिक्षक संघ सदिच्छा मंडळात मोठी फूट पडली आहे.तसेच जिल्यातील अनेक सदिच्छा चे पदाधिकारी गोकुळ कळमकर यांचे नेतृत्व मान्य करून त्यांच्या सोबत काम करण्यास तयार असल्याने सदिच्छा मंडळाला भविष्यात मोठा फटका बसणार आहे.
गेल्या पंचवीस वर्षांमध्ये शिक्षक नेते गोकुळ कळमकर यांनी संघाच्या माध्यमातून अनेक पदावर काम केले आहे अहमदनगर जिल्हा संघ व जिल्हा सदिच्छा मंडळातील हे कै.भा.दा.पाटील व खांदवे दादा नेतृत्व करत असताना सर्वांना सोबत घेऊन काम करत होते मात्र अलीकडच्या काळामध्ये जिल्ह्यातील अनेक मंडळी फिरून आलेल्या लोकांनी हे मंडळ ताब्यात घेतले आहे आजही खांदवे दादांचा शब्द अनेक कार्यकर्ते पाळत असतात मात्र काहींनी त्यांनाही डावलण्याचा प्रकार झाला असल्याने नाराजी वाढली सदिच्छा मंडळ व शिक्षक संघ यांची मूळ विचारधारा बाजूला पडलेली आहे शिक्षकांच्या प्रश्नासाठी कोणतेही काम येथे पाच वर्षापासून झाले नाही सर्व कामकाज बंद पडले आहे मंडळ व संघाचे निर्णय घेताना कोणालाही विश्वासात घेतले जात नाही अशी टिका शिक्षक संघाचे राज्य प्रतिनिधी गोकुळ कळमकर यांनी केली मंडळाच्या कारभाराला जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी कंटाळले होते दोन-तीन जण मनमानी पद्धतीने मंडळाचा कारभार करत आहेत त्यामुळे जिल्हाभर मंडळा विषयी नाराजी पसरली आहे मंडळातील डावपेज कुरघोडी यांना कंटाळून पारनेर तालुक्यातील मंडळाच्या अनेक अधिकारी पदाधिकारी यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले व मंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे  तालुक्यातील सर्व कार्यकर्ते गोकुळ कळमकर यांच्यासोबत असल्याची माहिती तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी दिली आहे जिल्ह्यात प्रमुख पाच मंडळे आहेत यात गुरुकुल गुरुमाऊली मंडळाचे दोन गट ऐक्य मंडळ व सदिच्छा मंडळ आता सदिच्छा मंडळाचे दोन गट पडले आहेत त्यामुळे शिक्षकांच्या अंतर्गत राजकारणाला मोठे वळण आगामी काळामध्ये लागणार आहे.
सदिच्छा मंडळाच्या ५ सप्टेंबर रोजी जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या होत्या या निवडीवर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी नाराज होते यानंतर काही दिवसातच गोकुळ कळमकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी त्याचवेळी राजीनामे दिले होते मंडळांमध्ये अनेक दिवस समझोता घडून आणण्यासाठी बैठका झाल्या मात्र तोडगा निघाला नाही अखेर त्याच धर्तीवर आज पारनेर तालुक्यातील सदिच्छा मंडळ व संघातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले व गोकुळ कळमकर यांच्या नेतृत्वाखाली भविष्यात काम करणार असल्याचे जाहीर केले आहे त्यामुळे सदिच्छा मंडळांमध्ये मोठा भूकंप झाला आहे असे म्हणावे लागेल. भविष्यात शिक्षकांच्या संघटित राजकारणाला वेगळे वळण लागणार असून कळमकर काय निर्णय घेतात याकडे जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे.
अहमदनगर जिल्हा संघ व जिल्हा सदिच्छा मंडळातील राजकारणाला कंटाळून पारनेर तालुक्यातील खालील पदाधिकारी यांनी राजीनामे दिले आहेत.
यामध्ये पारनेर तालुका शिक्षक संघ पदाधिकारी कारभारी बाबर अध्यक्ष शिक्षक संघ  पारनेर,रविंद्र रोकडे कार्याध्यक्ष शिक्षक  संघ पारनेर,सुभाष लाळगे सरचिटणीस शिक्षक संघ पारनेर,अनिल इकडे कार्या.चिटणीस शिक्षक संघ पारनेर,दादाभाऊ बेलोटे कोषाध्यक्ष शिक्षक संघ पारनेर,राजू इनामदार प्रसिद्धीप्रमुख शिक्षक संघ पारनेर,संतोष साबळे उपाध्यक्ष शिक्षक संघ पारनेर,राजेंद्र खोडदे उपाध्यक्ष शिक्षक संघ पारनेर,प्रदीप रसाळ सहचिटणीस शिक्षक संघ पारनेर,पारनेर तालुका सदिच्छा मंडळ पदाधिकारी सचिन परांडे सरचिटणीस सदिच्छा मंडळ पारनेर,बाळासाहेब रासकर कार्या.चिटणीस सदिच्छा मंडळ पारनेर,इंद्रभान ठाणगे उपाध्यक्ष सदिच्छा मंडळ पारनेर,संतोष दिवटे सहचिटणीस सदिच्छा मंडळ पारनेर,रमेश पावडे प्रसिद्धीप्रमुख सदिच्छा मंडळ पारनेर,गोरक्ष लोखंडचूर कोषाध्यक्ष सदिच्छा मंडळ पारनेर.पारनेर तालुका महिला आघाडी पदाधिकारी शुभांगीताई निकम अध्यक्षा महिला आघाडी पारनेर,छाया पवार कार्याध्यक्षा महिला आघाडी पारनेर,प्रज्ञा भोसले सरचिटणीस महिला आघाडी पारनेर,अनिता दिघे कार्या.चिटणीस महिला आघाडी पारनेर,वंदना आसने कोषाध्यक्ष महिला आघाडी पारनेर,सुरेखा पावडे प्रसिद्धीप्रमुख महिला आघाडी पारनेर.जिल्हा व राज्य प्रतिनिधी यादव सिनारे अध्यक्ष उच्चाधिकार समिती पारनेर पांडुरंग शिरोळे उच्चाधिकार समिती पारनेर,राजेंद्र ठुबे सदस्य अहमदनगर जिल्हा पदवीधर संघ,भरत लंके उच्चाधिकार समिती पारनेर,बाळासाहेब फटांगडे राज्य संघ प्रतिनिधी,राजू आत्तार उपाध्यक्ष अहमदनगर जिल्हा संघ,रामकृष्ण मेहेत्रे उच्चाधिकार समिती पारनेर,राजेंद्र शितोळे उच्चाधिकार समिती पारनेर,मंगल रांधवन सदस्य जिल्हा संघ महिला आघाडी. यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.
    
 शिक्षक बँकेची निवडणूक चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे त्या अनुषंगाने ५ सप्टेंबर रोजी सदिच्छा मंडळ व संघाच्या नवीन कार्यकारिणीच्या निवडी झाल्या होत्या मात्र त्या कार्यकारिणीच्या निवडीमध्ये नवख्या लोकांना संधी दिली गेल्यामुळे  मंडळातील अनेक सदस्य नाराज झाले होते त्या नाराजी मुळे आज पारनेर तालुक्यातील अधिकारी पदाधिकारी यांनी राजीनामे दिले आहेत भविष्यात सर्व कार्यकर्त्यांशी बोलून रणनिती आखली जाईल.
--------------
गोकुळ कळमकर 
शिक्षक संघाचे राज्य प्रतिनिधी
सदिच्छा मंडळाच्या निष्क्रिय व कुरघोडी डावपेचांच्या राजकारणाला कंटाळून तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिले आहेत शिक्षकांच्या प्रश्नाबाबत मंडळाची धोरणात्मक वाटचाल राहिलेली नव्हती भविष्यात गोकुळ कळमकर यांच्या सोबत राहण्याचा  आम्ही घेतला आहे.
------------
कारभारी बाबर 
अध्यक्ष शिक्षक संघ  पारनेर,