Breaking News

सैनिक बँकेतील गैरव्यवहार झाकण्यासाठी व्यवहारेंचा खटाटोप -पुरुषोत्तम शहाणे

सैनिक बँकेतील गैरव्यवहार झाकण्यासाठी व्यवहारेंचा खटाटोप -पुरुषोत्तम शहाणे
-----------
फसवणूक केली म्हणता तर माझ्यावर गुन्हा दाखल का नाही केला!
----------
सैनिक बँक कर्जदार फसवणूक प्रकरण.


पारनेर प्रतिनिधी- 
पारनेर सैनिक बँकेला फसवल्याची माझावर कसलीही  तक्रार  किंवा गुन्हा  पोलिस्टेशनला व न्यायालयात नसताना केवळ  स्वताची प्रतिमा उजाळ होण्यासाठी  व बँकेत केलेले गैरव्यवहारावरील सभासदांचे लक्ष वळवण्यासाठी चेअरमन शिवाजी व्यवहारे, व्यवस्थापक संजय कोरडे, संतोष भनगडे यांचा पत्रकबाजीचा केविलवाना खटाटोप सुरू आहे असा आरोप फर्यादि पुरुषोत्तम शहाणे यांनी केला आहे.
     सैनिक बँकेच्या अधिकारी व चेअरमन यांनी पुरुषोत्तम  शहाणे यांच्या मालमत्तेचा लिलाव बनावट करून त्यांची फसवणूक केल्याचा नुकताच  पारनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर शिवाजी व्यवहारे ,संजय कोरडे, संतोष भनगडे यांनी सभासदांमध्ये व खातेदार मध्ये   स्वतःची प्रतिमा उजाळ व्हावी या साठी "फिर्यादि निघाला आरोपी"कसा याचा उलगडा करावा त्यासाठी माझ्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत हे त्यांनी सांगावे असा सवाल शहाणे यांनी केला.
     पुरुषोत्तम शहाणे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की माझ्यावर सैनिक बँकेची न्यायालयात किंवा पोलिसात कसलीही तक्रार नाही.ज्या कोणी व्यक्तिने बनाव केला असे म्हणता तर त्या व्यक्तिबरोबर  बँक अधिकारी यांनी न्यायालयात तडजोड का केली? त्या व्यक्तिने पैशे भरल्यावर आमच्या तारण नसलेल्या मालमत्तेचा बनावट लीलाव का केला,मी फसवणूक केली म्हणता तर माझ्यावर गुन्हा दाखल का नाही केला?असा सवाल पुरुषोत्तम शहाणे यांनी उपस्थित केला आहे.
   माझ्या तक्रारीत तथ्य असल्यामुळे पारनेर पोलिस निरीक्षकांकडून  तक्रारदार , साक्षीदार ,बँक अधिकारी, पदाधिकारी यांचे वेगवेगळे  लिखित जबाब घेऊन तसा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे पाठिवला गेला . कर्जदाराची, खातेदाराची खरच फसवणूक झाल्याचे रेकॉर्डला खात्री झाल्यावर व सर्व पडताळणी करूनच गुन्हा दाखल केला गेला आहे.
      एकापाठोपाठ अनेक गैरव्यवहाराच्या मालिका समोर आल्याने व्यवहारे, कोरडे यांचा खरा चेहरा उघड झाला आहे.त्यामुळे ते सभासद व पारनेरकरांची दिशाभूल करण्यासाठी तथ्यहीन आरोप करत आहेत.खोट्या आरोपाची राळ उडवून देऊन, संभ्रमाचे वातावरण निर्माण करायचे व मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करणे ही व्यवहारे,कोरडे यांची कार्यपद्धती  असल्याचे उघड झाले आहे असे शहाणे यांनी म्हटले आहे.