Breaking News

धोत्रे येथे महिला लेबर कॉन्ट्रॅक्टर ला चाकूचा धाक दाखवत दोन लाखाचे सोन्याचे दागिने केले लंपास

धोत्रे येथे महिला लेबर कॉन्ट्रॅक्टर ला चाकूचा धाक दाखवत दोन लाखाचे सोन्याचे दागिने केले लंपास
------------
दोघांनी प्रतिकार केला त्यांना बेदम मारहाण आठ जणांविरोधात गुन्हा दाखल


पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील धोत्रे येथे एका महिला लेबर कॉन्ट्रॅक्टर ला सात ते आठ जणांनी चाकूचा धाक दाखवत दोन लाख तीन हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली त्यांना विरोध केला असता दोघांना काठीने बेदम मारहाण केली याबाबत पारनेर पोलीस स्टेशनमध्ये आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हॉटेल अभिषेक जवळ कच्च्या रस्त्यालगत पाण्याच्या टाकीजवळ धोत्रे तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथे चंद्रकला गोपाल गवळी वय 40 लेबर कॉन्ट्रॅक्टर मनेगाव सिन्नर जिल्हा नाशिक यांना आरोपी नामदेव उर्फ नामा व त्याचा मामा पंढरी उर्फ पंड्या तसेच त्यांचे अनोळखी सात ते आठ साथीदार यांनी चाकूचा धाक दाखवून त्यांचे दागिने जबरदस्तीने हिसकावून घेऊन त्यांना गवळी यांचा भाऊ अक्षय व बहिणीचा मुलगा दिपक यांनी प्रतिकार केला असता त्यांना लाथा बुक्क्यांनी काठीने मारहाण करून 203000 रुपयांचे सोन्याचे दागिने सह रोख रक्कम जबरी चोरी करून चोरून नेला याबाबतची फिर्याद चंद्रकला गवळी यांनी पारनेर पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ करत आहेत.