Breaking News

आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये श्री हॉरीझॉन स्पोर्ट्स अँड मार्शल आर्ट्स च्या खेळाडूंचे घवघवीत यश

आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये श्री हॉरीझॉन स्पोर्ट्स अँड मार्शल आर्ट्स च्या खेळाडूंचे घवघवीत यश


पारनेर/प्रतिनिधी :
   वॉको व्हर्च्यूअल क्वलिफिकेशन टुर्नामेंट एरो फिट ई म्युझीकल फॉर्म्स वेपन्स या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पारनेर तालुक्यातील २ खेळाडूंनी घवघवीत यश मिळविले शौर्य अभिजित शेळके  (१० वर्षे ) याने रौप्य पदक पटकावले, सूरज संतोष शिंदे (१७ वर्षे) याने कांस्य पदकाची कमाई केली. या खेळाडूंना प्रशिक्षक राजेश्वरी कोठावळे यांनी मार्गदर्शन केले.
     तसेच खेळाडू व प्रशिक्षकांचे वाको  महाराष्ट्र ) किकबॉक्सिंग असो. चे अध्यक्ष निलेश शेलार यांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या व पालकांनी अभिनंदन करत उत्तम यशाबद्दल समाधान व्यक्त केले.