Breaking News

पारनेर सैनिक बँकेच्या चेअरमन शिवाजी व्यवहारे माजी चेअरमन अर्जुन चौधरी यांच्यासह १३ जणांवर गुन्हे दाखल

पारनेर सैनिक बँकेच्या चेअरमन शिवाजी व्यवहारे माजी चेअरमन अर्जुन चौधरी यांच्यासह १३ जणांवर गुन्हे दाखल.
------------
फसवणूक प्रकरणी बँकेच्या आजी माजी चेअरमन सह व्यवस्थापक तलाठी मंडलाधिकारी  यासह १३ जणांवर गुन्हे दाखल.
-------------
कर्जदाराकडून कर्जाची परत फेड झाली असतानाही कर्ज थकित दाखवून कर्जदाराच्या मालमत्तेचा केला बेकायदेशीररीत्या लिलाव.


पारनेर/प्रतिनिधी :
  पारनेर तालुक्यातील सैनिक सहकारी बँकेकडून  घेतलेल्या कर्जाची परत फेड करूनही कर्जदारकडे ती रक्कम थकीत दाखवून कर्जदारने तारण ठेवलेल्या मालमत्तेचा बँकेला अधिकार नसतानाही बेकायदेशीररित्या हजर नसलेल्या व्यक्तींची खोटी सही करून फसवणूक केल्याप्रकरणी पुरुषोत्तम नारायण शहाणे वय ५४ वर्ष धंदा व्यवसाय रा सुपा तालुका पारनेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि.१० रोजी सैनिक बँकेचे चेअरमन व्यवस्थापक तत्कालीन मंडळाधिकारी तलाठी यासह १३ जणांवर पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्जदाराने कर्जाची रक्कम भरली असतानाही ती रक्कम थकीत दाखवून कर्जदाराने तारण ठेवलेल्या जमिनीचा बेकायदेशीररित्या लिलाव केला याप्रकरणी आरोपी तलाठी करपे मंडलाधिकारी दाते व बँक अधिकारी चेअरमन अर्जुन कारभारी चौधरी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय बाजीराव कोरडे  विद्यमान चेअरमन शिवाजी तुकाराम व्यवहारे वसुली अधिकारी प्रवीण नाथां निघोट व्यवस्थापक आप्पासाहेब बबन थोरात अनिल नामदेव मापारी  दत्तात्रय बबन भुजबळ रमेश भाऊसाहेब मासाळ भरत गजाभाऊ पाचारणे अरुण शांताराम आवारी संतोष गंगाराम भानगडी या १३ जणांवर पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 
दि १४ फेब्रुवारी २०११ रोजी पारनेर सैनिक बँक पारनेर तालुका पारनेर येथे पुरुषोत्तम नारायण शहाणे यांचा भाऊ राजेंद्र नारायण शहाणे यांनी सैनिक सहकारी बँकेकडून व्यवसायासाठी घेतलेल्या सहा लाखाच्या कर्जा पोटी थकित रकमेसह  २६ लाख ३३००० रुपये होत होती कर्जदारांनी ती रक्कम परतफेड केली असताना ती थकित असल्याचे दाखवून व सदर कर्जासाठी तारण असलेल्या मालमत्तेचा बँकेला कोणताही अधिकार  नसतानाही बँकेने  बेकायदेशीर व बोगस रीतीने प्रक्रिया राबवून त्या  मालमत्तेचा लिलाव केला तसेच  त्यात हजर नसलेल्या व्यक्तीची खोटी सही करून आम्हा भावंडांची आरोपींनी संगनमताने फसवणूक केली आहे अशी फिर्याद दिली यावरून पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी पद्मने करत आहेत.