Breaking News

शिरापूर येथील एका हॉटेलमध्ये पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात दारू जप्त एका वर गुन्हा दाखल.

शिरापूर येथील एका हॉटेलमध्ये पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात दारू जप्त एका वर गुन्हा दाखल.


पारनेर प्रतिनिधी -
 पारनेर तालुक्यातील शिरापूर येथील एका हॉटेलमध्ये पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 3910 रु ची देशी विदेशी दारू जप्त करण्यात आली असून एका वर पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हॉटेल वेदिका शिरापुर रोड अळकुटी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथे आरोपी अजय सुदाम साळवे वय 19 वर्ष राहणार शिरपूर तालुका पारनेर याने विनापरवाना बेकायदेशीर स्वतःच्या आर्थिक फायदा करिता 3910 ची देशी-विदेशी दारू हॉटेल वेदिका येथे विक्री करताना मिळून आला याबाबत फिर्याद पो.कॉ.सत्यजित सोनाजी शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.डी.ए.उजागरे करत आहेत.